IPL 2026 Auction Full list of purse remaining for all 10 teams: इंडियन प्रीमियर लीग २०२६ पूर्वी रिटेन्शन यादी जाहीर झाली आहे. रिटेन्शनपूर्वी, सर्व संघांनी ट्रेड विंडोमध्ये खेळाडूंची अदलाबदली केली. यानंतर १५ नोव्हेंबरच्या डेडलाईननुसार सर्व संघांनी रिलीज व रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यासह आता आयपीएल २०२६ च्या लिलावात कोणता संघ सर्वाधिक रकमेसह उतरणार आहे, जाणून घेऊया. यासह सर्व संघांच्या पर्समध्ये एकूण किती रक्कम आहे, पाहूया.
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात, सर्व संघांकडे १२० कोटी रुपये इतके पैसे होते, परंतु मिनी लिलावात तसं नसतं. मिनी लिलावात खेळाडूंना रिलीज केल्यानंतर उरलेल्या पैशांसह संघ लिलावात सहभागी होतात. आयपीएल २०२६ साठी रिटेन्शननंतर प्रत्येक संघाच्या खिशात किती पैसे शिल्लक आहेत, पाहूया.
आयपीएल २०२६ साठी रिटेन्शननंतर कोलकाता नाईट रायडर्स सर्वात मोठ्या रकमेसह मिनी-लिलावात उतरेल. केकेआरने आगामी हंगामासाठी १० खेळाडूंना रिलीज केलं आहे. संघाकडे १३ स्लॉट शिल्लक आहेत. तर चेन्नईच्या संघानेही ९ खेळाडूंना रिलीज केलं आहे.
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स आयपीएल २०२६ च्या लिलावात सर्वात कमी पैशांसह उतरणार आहे. आयपीएल रिटेन्शननंतर, मुंबईकडे फक्त २.७५ कोटी रुपये शिल्लक आहेत आणि त्यांना ५ जागा भरायच्या आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स
कोलकाता नाईट रायडर्स सर्वात मोठ्या रकमेसह मिनी लिलावात उतरणार आहे. केकेआरने आगामी हंगामासाठी १० खेळाडूंना रिलीज केलं आहे. यासह केकेआरचा संघ आता मिनी लिलावासाठी ६४.३ कोटींच्या मोठ्या रकमेसह उतरणार आहे. तर संघाकडे १३ स्लॉट शिल्लक आहेत.
चेन्नई सुपर किंग्स
केकेआर नंतर, मिनी-लिलावात सर्वाधिक पैसे असलेला संघ चेन्नई सुपर किंग्ज आहे. रिटेन्शननंतर सीएसकेकडे ४३.४ कोटी शिल्लक आहेत आणि त्यांना मिनी-लिलावात नऊ जागांसाठी बोली लावावी लागेल.
लखनौ सुपर जायंट्स
आयपीएल २०२६ च्या मिनी-लिलावासाठी लखनौ सुपरजायंट्सकडे २२.९ कोटी रुपये शिल्लक आहेत, तर लखनौ संघाला ६ जागा भरायच्या आहेत.
सनरायझर्स हैदराबाद
मिनी लिलावात सनरायझर्स हैदराबाद सर्वाधिक रक्कम असलेला तिसरा संघ आहे. रिटेन्शननंतर त्यांच्याकडे २५.५ कोटी आहेत आणि ते संघाकडे १० स्लॉट शिल्लक आहेत.
दिल्ली कॅपिटल्स
रिटेन्शननंतर, दिल्ली कॅपिटल्सकडे २१.८ कोटी शिल्लक आहेत आणि मिनी लिलावात त्यांना आठ जागांसाठी बोली लावायची आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
आयपीएल २०२५ चा विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही अनेक खेळाडूंना रिलीज केलं आहे. रिटेन्शननंतर, आरसीबीकडे आता १६.४ कोटी रुपये आहेत आणि मिनी-लिलावासाठी त्यांच्याकडे ८ स्लॉट शिल्लक आहेत.
राजस्थान रॉयल्स
रिटेन्शननंतर राजस्थान रॉयल्सकडे १६.०५ कोटी रुपये शिल्लक आहेत. आयपीएल २०२६ च्या लिलावासाठी संघाला नऊ जागा भराव्या लागणार आहेत.
गुजरात टायटन्स
शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सकडे रिटेन्शननंतर १२.९ कोटी शिल्लक आहेत. या मिनी-लिलावात त्यांच्याकडे फक्त पाच स्लॉट शिल्लक असतील.
पंजाब किंग्स
गतवर्षीचा उपविजेता संघ पंजाब किंग्स ११.५ कोटींच्या रकमेसह मिनी लिलावात उतरणार आहे आणि संघाकडे ४ स्लॉट शिल्लक आहेत.
