जगातील श्रीमंत टी-२० क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी दोन दिवस मेगा ऑक्शन होत आहे. आज या महालिलावाचा पहिला दिवस पार पडला. पहिल्या दिवशी ईशान किशन, दीपक चहर, आवेश खान, राहुल तेवतिया, राहुल त्रिपाठी, राहुल चहर, शार्दुल ठाकूर यांच्यावर पैशांचा पाऊस पडला आहे. आत्तापर्यंत झालेल्या लिलाव प्रक्रियेत भारतीय खेळाडूंटा वरचष्मा पाहायला मिळाला. यावेळी, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्ससह लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ लीगमध्ये सहभागी झाले आहेत.
पहिल्या दिवशी ९७ खेळाडूंवर बोली लागली. ७४ खेळाडूंना संघात स्थान मिळाले, तर २३ खेळाडूंना एकही खरेदीदार मिळाला नाही. ईशान किशनला (१५.२५) सर्वाधिक रक्कम मिळाली, तर आवेश खान आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला.
अष्टपैलू खेळाडू तेवतियासाठी गुजरात टायटन्सने ९ कोटी मोजले.
वेगवान गोलंदाज शिवम मावीसाठी केकेआरने ७.२५ कोटींची बोली लावली.
सरफराज खानला २० लाखांची बोली लावत दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात दाखल केले.
धाकड फलंदाज शाहरुख खानसाठी चेन्नई, पंजाबने बोली लावली. ९ कोटींमध्ये शाहरुख पंजाबसाठी खेळेल.
पंजाब, गुजरात आणि हैदराबादने अभिषेकसाठी बोली लावली. हैदराबादने ६.५० कोटींची बोली लावत अभिषेकला संघात घेतले.
राजस्थानने रियानसाठी ३.८० कोटी मोजले.
सी. हरि निशांत अनसोल्ड
फलंदाज राहुल त्रिपाठीसाठी जवळपास सर्वच फ्रेंचायझींनी बोली लावली. हैदराबादने त्याला ८.५० कोटींमध्ये संघात दाखल केले.
अनमोलप्रित सिंग अनसोल्ड
अश्विन हेब्बारसाठी दिल्ली कॅपिटल्सने २० लाख मोजले.
बेबी एबी म्हणून प्रसिद्ध झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविससाठी पंजाब, मुंबई आणि चेन्नईने बोली लावली. नुकत्याच झालेल्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये ब्रेविसने मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. मुंबईने ब्रेविसला ३ कोटींमध्ये संघात दाखल केले.
कर्नाटकचा फलंदाज अभिनव सदारंगनीसाठी गुजरात संघाने २.६० कोटी मोजले.
प्रियम गर्गसाठी हैदराबादने २० लाखांची बोली लावत त्याला संघात घेतले.
रजत पाटीदार अनसोल्ड
फिरकीपटू अमित मिश्रा अनसोल्ड राहिला.
भारताचा स्टार फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलसाठी मोठी बोली लागली. राजस्थानने चहलला ६.५० कोटी देत आपल्या संघात सामील करून घेतले.
मुंबईसाठी खेळलेल्या राहुलसाठी मुंबई, हैदराबाद, पंजाब, राजस्थान आणि दिल्लीने बोली लावली. पंजाबने राहुलला ५.२५ कोटींमध्ये संघात सामील करून घेतले.
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पासाठी कोणत्याही संघाने बोली लावली नाही.
भारताचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवसाठी पंजाब आणि दिल्लीने बोली लावली. दिल्लीने कुलदीपला २ कोटींमध्ये संघात घेतले.
दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकीपटू इम्रान ताहीर अनसोल्ड राहिला.
मुजीब झादरान अनसोल्ड राहिला.
इंग्लंडचा आदिल रशीद अनसोल्ड राहिला.
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रेहमानला २ कोटींमध्ये दिल्लीने आपल्या ताफ्यात सामील केले.
वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरसाठी मोठी बोली लागली. चेन्नईसाठी खेळलेला शार्दुल ठाकूर आता दिल्लीसाठी खेळणार आहे. त्याच्यासाठी १०.७५ कोटींची बोली लागली.
How is that for a bid? @DelhiCapitals fans are you happy to have Shardul in your team? #TATAIPLAuction @TataCompanies pic.twitter.com/SDcyitfNuq
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
हैदराबादने भुवनेश्वर कुमारला ४.२० कोटी देत पुन्हा आपल्या संघात घेतले.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज लखनऊ संघाने मार्क वूडसाठी ७.५० कोटी मोजले.
ऑस्ट्रेलियन गोलंदाज जोश हेझलवूडसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७.७५ कोटी मोजले.
न्यूझीलंडचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनसाठी गुजरात टायटन्सने १० कोटी मोजले.
टीम इंडियासाठी दमदार प्रदर्शन केलेला वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णासाठी लखनऊ संघाने सुरुवातीला बोली लावली. मात्र राजस्थानने त्याला १० कोटी देत आपल्या संघात सामील करून घेतले.