Chennai Super Kings vs Gujarat Titans Final Match in IPL 2023: इंडियन प्रीमियर लीगचा १६वा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. साखळी टप्प्यातील सर्व ७० सामने खेळले गेले असून आज अंतिम सामना खेळला जाणार आहे. आयपीएल २०२३ चा अंतिम सामना २८ मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. आज या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात प्रमुख ५ खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१. राशिद खान

अफगाणिस्तानचा स्टार लेग-स्पिनर रशीद खान त्याच्या जादुई फिरकीने अहमदाबादच्या खेळपट्टीवर कहर करू शकतो. या मोसमात त्याने गुजरात टायटन्ससाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. राशिदने आयपीएल २०२३ मध्ये आतापर्यंत २७ विकेट घेतल्या आहेत. त्याचवेळी पर्पल कॅपधारक मोहम्मद शमीच्या नावावरही केवळ २८ विकेट आहेत. विशेष म्हणजे राशिद खान आपल्या संघांसाठी वेळोवेली बॅटनेही योगदान देताना दिसला आहे.

२. शिवम दुबे

डावखुरा स्फोटक फलंदाज शिवम दुबे यंदाच्या मोसमात वेगळ्या शैलीत फलंदाजी करत आहे. या सीझनमध्ये शिवमच्या बॅटमधून अनेक लांब षटकार दिसले आहेत. आयपीएल २०२३ मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा शिवम तिसरा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत १३ डावात ३३ षटकार मारले आहेत.

हेही वाचा – IPL 2023 Final CSK vs GT: फायनलमध्ये एमएस धोनी चार धावा करताच रोहित शर्माला टाकणार मागे, ‘हा’ कारनामा करणारा ठरणार तिसराच फलंदाज

३. शुबमन गिल

गुजरात टायटन्सला अंतिम सामन्यात नेण्यात सलामीवीर शुबमन गिलचा मोठा वाटा आहे. या मोसमात सर्वाधिक धावा करणारा गिल पहिल्या क्रमांकावर आहे. तीन शतकांसह गिलच्या बॅटमधून आतापर्यंत ८५१ धावा आल्या आहेत.

४. ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्जला अंतिम फेरीत नेण्याची सर्वात मोठी जबाबदारी ऋतुराज गायकवाडच्या युवा खांद्यावर असेल. गायकवाडने या मोसमात ५६४ हून अधिक धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याच्या बॅटमधून २९ षटकारही निघाले आहेत.

हेही वाचा – IPL 2023 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२३ चा अतिंम सामना गुजरात की चेन्नई? क्रिकेटच्या दिग्गजांनी केली भविष्यवाणी, पाहा VIDEO

५. महेंद्रसिंग धोनी

आज सर्वांच्या नजरा जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीवर खिळल्या आहेत. वास्तविक, धोनीची ही शेवटची आयपीएल असू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. त्याचबरोबर धोनी शेवटच्या वेळी खेळताना दिसेल असाही फॅन्सचा अंदाज आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All eyes will be on performance of dhoni gill khan gaikwad dube players in ipl 2023 final match gt vs csk vbm