scorecardresearch

Premium

IPL 2023 Final CSK vs GT: फायनलमध्ये एमएस धोनी चार धावा करताच रोहित शर्माला टाकणार मागे, ‘हा’ कारनामा करणारा ठरणार तिसराच फलंदाज

MS Dhoni to overtake Rohit Sharma:सीएसके आणि जीटी संघांत आयपीएल २०२३ मधील अंतिम सामना आज खेळला जाणार आहे. या सामन्यात एमएस धोनीकडे रोहित शर्माला मागे टाकण्याची संधी असणार आहे. त्यासाठी एमएस धोनीला फक्त चार धावा करण्याची गरज आहे.

IPL 2023 Final GT vs CSK
रोहित शर्मा आणि एमएस धोनी (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

As MS Dhoni scores 4 runs he will overtake Rohit Sharma: आयपीएल २०२३ चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी साखळी फेरीत या दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली होती. ज्यामुळे गुणतालिकेत गुजरात पहिल्या तर चेन्नई दुसऱ्या स्थानावर राहिला होता. आता महेंद्रसिंग धोनी अंतिम सामन्यात केवळ चार धावा केल्यानंतर रोहित शर्माचा एक विक्रम मोडेल.

एमएस धोनी मोडणार रोहित शर्माचा विक्रम –

महेंद्रसिंग धोनी खेळाडू म्हणून त्याची ११वी फायनल खेळणार आहे. धोनीने आतापर्यंत आयपीएल फायनलच्या १० सामन्यांमध्ये १८० धावा केल्या आहेत, ज्यात ६३ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. धोनीने आजच्या सामन्यात आणखी चार धावा केल्या, तर तो रोहित शर्माला मागे टाकेल. रोहितने आयपीएलच्या आतापर्यंत सहा अंतिम सामन्यात १८३ धावा केल्या आहेत.

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
ajit pawar
“माझ्याकडील अर्थखातं पुढं टिकेल, नाही टिकेल सांगता येत नाही, पण…”, अजित पवारांचं विधान
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’

आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –

१. सुरेश रैना – २४९ धावा
२. शेन वॉटसन – २३६ धावा
३. रोहित शर्मा – १८३ धावा
४. मुरली विजय – १८१ धावा
५. महेंद्रसिंग धोनी – १८० धावा
६. किरॉन पोलार्ड – १८० धावा

हेही वाचा – IPL 2023 Final GT vs CSK: जेतेपदाच्या सामन्यात एमएस धोनी मैदानात उतरताच रचणार इतिहास, ‘हा’ मोठा पराक्रम करणारा ठरणार पहिलाच खेळाडू

स्फोटक फलंदाजी करण्यात धोनी तरबेज –

महेंद्रसिंग धोनीची गणना जगातील सर्वोत्तम फिनिशरमध्ये केली जाते. त्याने चेन्नई सुपर किंग्जसाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. डेथ ओव्हर्समध्ये स्फोटक फलंदाजी करण्यात तो माहिर आहे. त्याने २४९ सामन्यांमध्ये ५०८२ धावा केल्या आहेत ज्यात ८४ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याचे यष्टिरक्षण कौशल्यही अप्रतिम आहे. त्याने १४१ झेल आणि ४१ स्टंपिंग केले आहेत.

सीएसके संघाने चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. सीएसकेच्या संघाने १०व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आयपीएलच्या केवळ १४ हंगामात संघ खेळला आहे. संघाकडे स्टार खेळाडूंची फौज आहे, जे अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचा मार्ग बदलू शकतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-05-2023 at 15:05 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×