Virender Sehwag Statement On CSK Team Performance : आयपीएलचा पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगला. या सामन्यात सीएसकेनं गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला आणि आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला. सीएसकेनं आतापर्यंत आयपीएलच्या फायनलमध्ये १० वेळा प्रवेश केला आहे. धोनीच्या पलटणने जबरदस्त कामगिरी करून चाहत्यांचा उत्साह वाढवला आहे. सीएसकेला आता अजून एका आयपीएलचा किताब जिंकण्याची संधी आहे. अशातच टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम एस धोनीवर स्तुतीसुमने उधळली आहेत. सेहवागनं म्हटलं आहे की, एम एस धोनीमुळं चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल २०२३ च्या फायनलमध्ये पोहचू शकली. धोनीच्या अप्रतिम कॅप्टन्सीमुळंच त्याला चाहत्यांकडून भरभरून प्रेम आणि सन्मान मिळतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेन्नई सुपर किंग्जच्या कामगिरीबाबत सेहवागची मोठी प्रतिक्रिया

वीरेंद्र सेहवागने सीएसकेच्या अप्रतिम कामगिरीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सेहवागने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सेहवागने म्हटलंय, चेन्नई सुपर किंग्ज एक जबरदस्त संघ आहे. तुमच्या संघात असलेल्या खेळाडूंकडून चागलं प्रदर्शन करवून घेणं, म्हणजेच एक चांगली लिडरशिप असते. ज्या प्रकारचे गोलंदाज चेन्नईकडे होते, त्यांच्याकडे पाहता फक्त एम एस धोनीच फायनलपर्यंत संघाला पोहचवू शकला आहे. यामुळेच धोनीला एवढं प्रेम मिळतं.

नक्की वाचा – रविंद्र जडेजाच्या मनात चाललंय तरी काय…? ‘ते’ ट्वीट व्हायरल होताच जड्डूला RCB कडून खेळण्याची मागणी

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यानेही एम एस धोनीचं कौतुक केलं. पांड्याने म्हटलं, एम एस धोनीची हीच खासियत आहे. बुद्धीचा वापर करून धोनी ज्याप्रकारे गोलंदाजांचा प्रयोग करतो, ते पाहून असं वाटतं त्यांच्या संघाने आणखी १० धावा जोडल्या आहेत. आम्ही सलग विकेट गमावत राहिलो आणि धोनीनं योग्यवेळी योग्य गोलंदाजाचा प्रयोग केला. मला धोनीबद्दल खूप आनंद वाटत आहे. जर आम्ही पुढील सामना जिंकलो, तर रविवारी फायनलमध्ये धोनीच्या संघाविरोधात पुन्हा लढत देणं खूप महत्वाचं ठरेल.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chennai super kings have entered into ipl 2023 final only because of ms dhoni virender sehwag instagram post viral nss