Ravindra Jadeja Tweet Viral : आयपीएल २०२३ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. चेन्नईने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. गुजरातच्याविरोधात चेन्नईने २० षटकात ७ विकेट्स गमावत १७२ धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात गुजरातचा आख्खा संघ १५७ धावांवर गारद झाला. सामना संपल्यानंतर प्राईज सेरेमनीदरम्यान चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला ‘अपस्टोक्स मोस्ट वॅल्युएबल अॅसेट ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला.

त्यानंतर जडेजाने त्याच्या ट्वीटरव अकाऊंटवर एक ट्वीट करत काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘अपस्टॉक्सला माहित आहे पण काही चाहत्यांना नाही..’ जडेजाच्या या ट्वीटनंतर चाहत्यांनी रिट्वीटचा वर्षाव केला आणि बघता बघता #cometoRCB हा ट्रेंड ट्वीटरवर सुरु झाला. जडेजाने गुजरातविरोधात १६ चेंडूत २२ धावांची खेळी केली आणि गोलंदाजीत ४ षटकांमध्ये १८ धावा देत २ विकेट्सही घेतल्या.

Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Suresh Raina Helps Limping ms dhoni Viral Video
IPL 2024: चालताना त्रास होणाऱ्या धोनीला सुरेश रैन्नाने दिला आधार, व्हीडिओ होतोय तुफान व्हायरल
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: १२ वर्षांनी शतक तरीही सेलिब्रेशन नाही, रोहित शर्माचा सामन्यानंतरचा व्हीडिओ चाहत्यांना करतोय भावुक

नक्की वाचा – पाथिरानाला गोलंदाजी करण्यास अंपायरने केली मनाई, धोनीनं पाहिलं अन् मैदानात ‘असा’ गोंधळ उडाला…पाहा Video

“कर्माची फळं तुला भोगावी लागतील. आता किंवा नंतर. पण नक्कीच”, अशा प्रकारचं ट्वीट जडेजानं काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यानंतर संपूर्ण क्रिडाविश्वात एकच खळबळ उडाली होती. जडेजाच्या या पोस्टमुळं चाहत्यांनाही धक्का बसला होता. नेटकऱ्यांनी या प्रकरणाबाबातही ट्वीटरवर भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला. दरम्यान, यंदाच्या आयपीएल हंगामात जडेजाने १४ सामन्यांमध्ये १५३ धावा करत १७ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली आहे.