Premium

IPL2023: “माही भाई आपके लिए तो कुछ भी…” धोनीने रवींद्र जडेजाला CSKमध्ये राहण्यासाठी कसे पटवले? जाणून घ्या

Ravindra Jadeja: चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी प्रेमळ संदेश लिहिताना काही छायाचित्रे शेअर केली आहेत.

IPL2023: Mahi bhai aapke liye toh kuch bhi Jadeja shared pictures with Dhoni writing a lovely message
सौजन्य- IPL २०२३ (ट्विटर)

MS Dhoni Ravindra Jadeja Relationship IPL 2023: सोमवारी एका जादुई रात्रीनंतर एम.एस. धोनीने रवींद्र जडेजाला खांद्यावर उचलले आणि डोळ्यातील अश्रू हे चित्र मंगळवारी सोशल मीडियावर ट्रेंड करत होते. सीएसकेच्या मोहिमेचा हा एक सुंदर शेवट दिसत होता आणि धोनीने त्या एपिसोडमध्ये एक सोनेरी पान जोडले. त्याने सामन्याचा नायक जडेजा आणि निवृत्त खेळाडू अंबाती रायडूला ट्रॉफी स्वीकारण्यासाठी मंचावर बोलावले. हे पाहून सर्वांच्या तोंडून वाक्य बाहेर पडले, ‘एकच हृदय आहे, किती वेळा जिंकणार माही.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धोनी आणि जडेजाने भारतासाठी अनेक सामने जिंकले. ही जोडी अफलातून होती, परंतु न्यूझीलंड विरुद्ध २०१९च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीत भारतीय संघ दुर्दवीरित्या बाहेर पडला. दोघांनाही टीम इंडिया बाहेर पडल्याची वेदना आयुष्यभर जाणवत असेल. एकमेकांबद्दल प्रचंड आदर असूनही त्यांची केमिस्ट्री नेहमीच गुळगुळीत राहिली नाही. गेल्या वर्षी जेव्हा जडेजाला कर्णधार बनवण्यात आले आणि नंतर वगळले तेव्हा जडेजाने सीएसके कॅम्प सोडला.

जडेजाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून CSK शी संबंधित सर्व पोस्ट काढून टाकल्या. एक काळ असा होता की फ्रँचायझी आणि खेळाडू यांच्यातील सर्व संवादही बंद झाला होता. त्याला फ्रेंचायझी सोडायची होती, पण धोनीनेच हे प्रकरण हाताळले. तो म्हणाला की, “जडेजाला CSK सोडण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. त्याने सर जडेजाला सीएसकेसोबत राहिल्यास किती महत्वाचे आहे हे पटवून दिले.”

चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२३मध्ये त्यांचा शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला. या सामन्यानंतर धोनी आणि जडेजा यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, मोसमात चॅम्पियन बनल्यानंतर हे सर्व संपुष्टात येताना दिसत आहे. स्वतः रवींद्र जडेजाने हा ब्रेक लावला आहे. वास्तविक, आयपीएल २०२३मध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने एक सुंदर संदेश लिहून कॅप्टन धोनीसोबतचे काही फोटो शेअर केले होते.

जडेजाने त्याच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे तीन फोटो शेअर केले आहेत. एकात जडेजा धोनीसोबत ट्रॉफी हातात धरताना दिसत आहे, दुस-या चित्रात जडेजा पत्नी रिवाबासोबत आणि धोनी आयपीएल ट्रॉफीसोबत दिसत आहे आणि तिसऱ्या चित्रात त्याने सामना संपल्यानंतर धोनीने त्याला उचलून घेतलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोंना कॅप्शन देत जडेजाने लिहिले की, “आम्ही हे फक्त महेंद्रसिंग धोनीसाठी केले. तुमच्यासाठी काहीही, माही भाई…” पुढे, त्याने दोन हार्ट इमोजी देखील शेअर केले.

हेही वाचा: IPL 2023: “धोनी हा खूप चलाख असून जडेजाला…” सामन्यानंतर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचे मोठे विधान

धोनी आता निवृत्तीच्या दिशेने चालला आहे. पुढच्या हंगामात क्वचितच खेळू शकेल. अशा स्थितीत सीएसकेचा भावी कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडची निवड करण्यात येऊ शकते, पण पुढच्या सत्रात जडेजाला कर्णधार म्हणून दुसरी संधी दिल्यास आश्चर्य वाटणार नाही. यावेळी त्याने जे केले त्यामुळे त्याच्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला असता. मात्र, सीएसके संघ ज्यापद्धतीने विचार करतो, त्यामुळे हा निर्णय लवकर घेतला जाणार नाही.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How ms dhoni convinced ravindra jadeja to stay in csk inside story after the collision avw

Next Story
IPL 2023: “धोनी हा खूप चलाख असून जडेजाला…” सामन्यानंतर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचे मोठे विधान