IPL 2024 playoffs equation for RCB and other team : आयपीएल २०२४ प्लेऑफपासून काही पावले दूर आहे. काही संघ विजयाच्या रथावर स्वार होऊन प्लेऑफच्या दिशेने वाटचाल करत आहेत, तर काही पराभवाच्या गर्देत अडकले आहेत. सलग पराभवाचा सामना करणाऱ्या संघांमध्ये आरसीबीचेही नाव आहे. अलीकडेच, केकेआरविरुद्धच्या रोमहर्षक लढतीत, आरसीबीला एका धावेने दारूण पराभव पत्करावा लागला. ज्यानंतर आरसीबीचे चाहते प्लेऑफ संघातून बाहेर पडल्याने खूप निराश झाले आहेत. पण प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा आरसीबीच्या अजूनही जिवंत आहेत.

आरसीबीसाठी ‘करो या मरो’ची परिस्थिती –

आरसीबी संघ ८ सामने खेळला असून या संघाचे ६ सामने बाकी आहेत. हे सर्व सामने जिंकल्यानंतरही आरसीबी इतर संघांवर अवलंबून राहू शकते. जर आरसीबीने धावगती लक्षात घेऊन सर्व सामने जिंकले तर संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघाचे १४ गुण असणे आवश्यक आहे. आरसीबीचे सध्या २ गुण आहेत आणि ६ सामने जिंकल्यानंतर संघाचे १४ गुण होऊ शकतात. मात्र संघाला धावगतीकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. अशा परिस्थितीत आरसीबीसाठी प्रत्येक सामना ‘करो या मरो’ अशा स्वरुपाचा आहे.

मुंबई इंडियन्सही प्लेऑफचे दावेदार –

आयपीएल २०२४ मध्ये मुंबई संघही पिछाडीवर असल्याचे सिद्ध झाले. ८ सामन्यांपैकी ५ वेळा चॅम्पियन संघाने केवळ ३ सामने जिंकले आहेत. मुंबई संघाने पुढील ६ सामने जिंकल्यास या संघाला प्लेऑफचे तिकीट मिळू शकते. आता नशीब या दोन्ही संघांना साथ देते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पंजाब किंग्जचे पण ८ सामन्यात ४ गुण असून त्यालाही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे.

हेही वाचा – DC vs GT : ऋषभ-अक्षरच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीचा गुजरातवर ४ धावांनी निसटता विजय, मिलरचे अर्धशतक ठरले व्यर्थ

राजस्थान रॉयलचे प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित –

राजस्थान रॉयल्स संघ गुणतालिकेत आघाडीवर असून आठ पैकी ७ सामने जिंकले आहेत. संघाचे १४ गुण आहेत. दुसरा कोणताही संघ त्याच्या जवळ नाही. आता प्रत्येकी दहा गुणांसह ३ संघ आहेत. केकेआर, एसआरएछ आणि एलएसजी यांचे प्रत्येकी १० गुण आहेत. तथापि, एलएसजीसाठी समस्या अशी आहे की केकेआर आणि एसआरएचने आतापर्यंत केवळ ७ सामने खेळले आहेत, तर एलएसजीने आता ८ सामने खेळले आहेत.

हेही वाचा – DC vs GT : ऋषभने धुलाई करताच, मोहित शर्मा ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज

आयपीएल २०२४ मधील सध्याची गुणतालिका –

राजस्थान रॉयल्स: ८ सामने- ७ जिंकले
कोलकाता नाईट रायडर्स: ७ सामने- ५ जिंकले
सनरायझर्स हैदराबाद: ७ सामने- ५ जिंकले
लखनौ सुपर जायंट्स: ८ सामने- ५ जिंकले
चेन्नई सुपर किंग्ज: ८ सामने- ४ जिंकले
गुजरात टायटन्स: ८ सामने- ४ जिंकले
मुंबई इंडियन्स: ८ सामने- ३ जिंकले
दिल्ली कॅपिटल्स: ८ सामने- ३ जिंकले
पंजाब किंग्ज: ८ सामने- २ जिंकले
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु: ८ सामने- २ जिंकला