Mohit Sharma Unwanted Record in IPL History : दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २२४ धावा केल्या. या दरम्यान ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्या बॅटमधून चमकदार खेळी पाहायला मिळाली. त्याचवेळी या सामन्यात गुजरात टायटन्सच्या गोलंदाज मोहित शर्माने एक नकोसा विक्रमही केला. मोहित शर्मा हा गोलंदाज खूप महागडा ठरला आणि लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला.

मोहित शर्माने आयपीएलमध्ये केला नकोसा विक्रम –

गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा या सामन्यात चांगलाच महागडा ठरला. त्याने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये ७३ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. यासह त्याने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकण्याचा विक्रम केला. यापूर्वी हा विक्रम बेसिल थम्पीच्या नावावर होता. बासिल थम्पीने २०१८ मध्ये ४ षटकात ७० धावा दिल्या होत्या. त्याचबरोबर यश दयाल या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. यश दयालने गुजरात टायटन्सकडून खेळताना ४ षटकात ६९ धावा दिल्या होत्या. ज्यात त्याच्या एका षटकात रिंकू सिंगने पाच षटकारही मारले होते.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
ajit pawar sharad pawar (4)
“२०१४ च्या निवडणुकीचा निकाल यायच्या आधीच…”, अजित पवारांची शरद पवारांवर टीका; म्हणाले “मी पहाटे पाच वाजता…”
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
DC beat RR by 20 Runs sanju samson wicket Controversy
IPL 2024: संजू सॅमसनला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त; राजस्थान पराभूत, प्लेऑफ प्रवेश लांबणीवर

आयपीएलच्या एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज –

०/७३ – मोहित शर्मा
०/७० – बेसिल थम्पी
०/६९ – यश दयाल
१/६८ – रीस टोपली
०/६६ – क्वेना मफाका

हेही वाचा – DC vs GT : शुबमन गिलने केला खास पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा सर्वात तरुण खेळाडू

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५०हून अधिक धावा देणारे गोलंदाज –

७ वेळा – मोहित शर्मा
६ वेळा – मोहम्मद शमी
६ वेळा – भुवनेश्वर कुमार<br>५ वेळा – ख्रिस जॉर्डन
५ वेळा – उमेश यादव</p>

हेही वाचा – Champions Trophy 2025 : टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार की नाही? मोठी अपडेट आली समोर

मोहित शर्माने एका षटकात दिल्या ३१ धावा –

मोहित शर्माने या डावातील शेवटचे षटकही टाकले. यावेळी ऋषभ पंत स्ट्राइकवर होता. मोहित शर्माने या षटकात एकूण ३१ धावा दिल्या. वाईड बॉलमधून १ धाव आणि ऋषभ पंतच्या बॅटमधून ३० धावा आल्या. या षटकात ऋषभ पंतने १ चौकार आणि ४ षटकार ठोकले. पंत या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने ४३ चेंडूत नाबाद ८८ धावा केल्या. यादरम्यान त्याने ५ चौकार आणि ८ षटकार मारले. दुसरीकडे अक्षर पटेलनेही अप्रतिम फलंदाजी केली. तो ४३ चेंडूत ६६ धावा करून बाद झाला.