आयपीएल २०२२चे वेळापत्रक जवळपास निश्चित झाले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून टी-२० लीगचा नवा हंगाम सुरू होऊ शकतो. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने आयपीएल २०२१चे विजेतेपद पटकावले. अशा स्थितीत गतविजेता असल्याने त्यांना सलामीच्या सामन्यात संधी मिळेल. येणाऱ्या हंगामात ८ ऐवजी १० संघ मैदानात उतरतील. दोन नवीन संघ जोडल्याने सामन्यांची संख्या ६० वरून ७४ वर जाईल. यावेळी बीसीसीआयने टी-२० लीगचा संपूर्ण हंगाम देशातच होणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Cricbuzzच्या बातमीनुसार, आयपीएल २०२२चा हंगाम २ एप्रिलपासून सुरू होऊ शकते. पहिला सामना चेन्नईत होणार आहे. या वेळी सामने वाढल्यामुळे ही लीग ६० दिवसांपेक्षा जास्त काळ चालू शकते. ४ किंवा ५ जूनला अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो. मात्र, सर्व संघांना पूर्वीप्रमाणे १४-१४सामने खेळावे लागणार आहेत. ७ सामने घरच्या मैदानावर तर ७ सामने घराबाहेर खेळवले जातील.

हेही वाचा – भारत-न्यूझीलंड क्रिकेट मालिका : कसोटी पदार्पणासाठी मुंबईकरांमध्ये चुरस!

सलामीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जचा सामना कोणत्या संघाशी होईल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण पूर्वीप्रमाणेच त्याची टक्कर मुंबई इंडियन्सशी असू शकते, असे मानले जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने सर्वाधिक वेळा टी-२० लीगचे विजेतेपद पटकावले आहे. सीएसकेने ४ वेळा विजेतेपद पटकावले आहे.

आयपीएल २०२०चा संपूर्ण हंगाम, तर आयपीएल २०२१चा अर्धा हंगाम यूएईमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र बोर्डाचे सचिव जय शहा यांनी सध्याचा हंगाम देशातच होणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. अहमदाबाद आणि लखनऊ हे नवीन संघ लीगमध्ये सामील झाले आहेत. मेगा लिलाव जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. भारत आणि न्यूझीलंड मालिकेत चाहते स्टेडियमवर येत आहेत. अशा परिस्थितीत आयपीएलमध्येही यावेळी मोठ्या संख्येने चाहते येऊ शकतात.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 likely to kick off on april 2 in chennai adn