IPL 2023 Final, Gautam Gambhir: जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनी सध्या चर्चेत आहे. एम.एस. धोनीने चेन्नई सुपर किंग्सला त्याच्या नेतृत्वाखाली ५व्यांदा आयपीएलचे चॅम्पियन बनवले आहे. आयपीएल २०२३च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने डकवर्थ लुईसच्या नियमानुसार गुजरात टायटन्सचा ५ विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले. सीएसकेच्या या विजयावर टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौतम गंभीरने धोनीचे कौतुक केले

गौतम गंभीर हा आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्स संघाचा मार्गदर्शक आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या विजयावर ट्विट करत त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सीएसकेचे दुसरे जेतेपद पटकावल्यावर गौतम गंभीरने ट्विट केले की, “चेन्नईचे अभिनंदन! इथे एक विजेतेपद जिंकणे कठीण, त्याने पाच जिंकले आहेत हे अविश्वसनीय!” गौतम गंभीरचे हे ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होत असून गौतम गंभीरच्या या प्रतिक्रियेला चाहत्यांनी पसंती दिली आहे.

हेही वाचा: IPL 2023 Final Match: चेन्नईच्या विजयाने उथप्पाने असे काही केले की आपल्या मुलाला…; live सामन्यातील समालोचकांचा Video व्हायरल

कर्णधार म्हणून धोनीचा विक्रम

एम.एस. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्याच वेळी, एम.एस. धोनी आयपीएलमध्ये त्याने २५० सामने खेळले असून त्यातील कर्णधार म्हणून २२६ सामन्यांमध्ये संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. जो आयपीएलच्या इतिहासातील कोणत्याही खेळाडूने केलेला सर्वोच्च विक्रम आहे. या सामन्यांमध्ये महेंद्रसिंग धोनीने १३३ सामने जिंकले आहेत तर ९१ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. कर्णधार म्हणून एम.एस.धोनीने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ मध्ये चॅम्पियन बनण्यात यशस्वी ठरला आहे. त्याचबरोबर कर्णधार म्हणून गौतम गंभीर देखील आयपीएलमध्ये २ वेळा चॅम्पियन बनला आहे.

मार्गदर्शक म्हणून संघ प्लेऑफमध्ये पोहोचला

साखळी फेरीत लखनऊ सुपर जायंट्सच्या यशात गौतम गंभीरचा मोठा हात होता. लखनऊ सुपर जायंट्सचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये केवळ प्लेऑफ पर्यतच पोहोचू शकला. एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाला मुंबई इंडियन्सकडून पराभवाला सामोरे जावे लागले.

हेही वाचा: IPL 2023: नाव मोठं अन्…! हे स्टार खेळाडू बनले हिरोपासून झिरो, फ्रँचायझींचे पैसे गेले वाया, जाणून घ्या

पुढच्या मोसमात खेळणार की नाही हे धोनीने सांगितले

अंतिम सामन्यानंतर धोनी निवृत्तीची घोषणा करणार का याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. याबाबत धोनी म्हणाला की, “त्याला निवृत्ती घ्यायची आहे, मात्र या मोसमात चाहत्यांकडून मिळालेले प्रेम पाहता त्याला आणखी एक हंगाम खेळायला आवडेल. पण या सर्व गोष्टींवर निर्णय घेण्यासाठी त्याच्याकडे अजून बराच वेळ आहे.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 final congratulations from england on ms dhoni becoming champion for the 5th time gautam gambhir cant believe it avw