आयपीएल २०२३चा २१वा सामना शनिवारी लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने २० षटकांत आठ गडी गमावून १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबने १९.३ षटकांत आठ गडी गमावून लक्ष्य गाठले. सिकंदर रझा पंजाबच्या विजयाचा हिरो ठरला. या सामन्यात अनेक रोमांचक क्षण होते. यातील काही चाहते काही अनोखे पोस्टर्स आणि फलक घेऊन लखनऊच्या एकना स्टेडियमवर पोहोचले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंजाब किंग्जची मालकीण प्रीती झिंटाला पाहण्यासाठी एक चाहता गेला. त्याने त्याच्या पोस्टरवर लिहिले, “तुम्ही लोक मॅच पाहा, मी प्रीती झिंटाला पाहायला आलो आहे. त्याचवेळी दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “मला लखनऊमध्ये ‘माहीचा’ सामना बघायचा होता, पण ४ मे रोजी सुट्टी मिळू शकली नाही. काही चाहते ‘आय लव्ह राहुल’चे पोस्टर घेऊन पोहोचले होते.

प्रीती झिंटाने मोहम्मद शमीशी केलेल्या चर्चेचे फोटो व्हायरल

हा सामना पाहण्यासाठी पंजाब किंग्जची मालकीण प्रीती झिंटाही पोहोचली होती. बैसाखीच्या एक दिवस आधी झालेल्या या मॅचमध्ये प्रीती पूर्णपणे ‘पंजाबी कुडी’ लूकमध्ये पोहोचली. प्रिती झिंटाने केशरी रंगाचा दुपट्टा आणि लाल रंगाचा सूट परिधान केला होता. सामन्यानंतर प्रीती झिंटाने स्टेडियममध्ये आलेल्या चाहत्यांना पंजाब किंग्जची जर्सीही वाटली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. प्रिती झिंटाचे फोटोही सोशल मीडियावर खूप शेअर केले जात आहेत. प्रीती झिंटा नेहमीच आयपीएल दरम्यान पंजाब किंग्जला सपोर्ट करताना दिसत आहे.

याशिवाय प्रिती झिंटाचा मोहम्मद शमीसोबतचा एक फोटोही चांगलाच व्हायरल होत आहे. शमी सध्या गुजरात टायटन्सकडून खेळतो, मात्र त्याआधी तो पंजाब किंग्जकडूनही खेळला आहे. प्रीती झिंटा आणि शमी यांच्यातील चर्चा पाहून चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावून १५३ धावा केल्या.

हेही वाचा: IPL 2023: “त्याने माहीसारखी फलंदाजी…”, हरभजन सिंगने संजू सॅमसनची केली धोनीशी तुलना, BCCIला ‘ही’ केली विनंती

१५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाने १९.५ षटकांत चार विकेट गमावत १५४ धावा करून सामना जिंकला. चार षटकांत १८ धावा देत दोन बळी घेणाऱ्या मोहित शर्माला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. शुबमन गिलने ४९ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. त्याचवेळी वृद्धिमान साहाने १९ चेंडूत ३० धावांची खेळी केली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 you people watch the match i have come to see preity zinta fan reached ikana in lucknow with a unique poster avw