IPL Auction 2025 Day 2 Live Updates, 25 November 2024: आयपीएल २०२५चा महालिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया येथे पार पाडला. अनेक खेळाडूंवर विक्रमी बोली लागल्या तर काही खेळाडूंनी इतिहासही रचला. स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला लखनौ सुपर जायंट्सने (एलएसजी) २७ कोटी रुपयांना संघात सामील केले. तर श्रेयस अय्यर २६.७५ कोटींना पंजाब किंग्सच्या ताफ्यात सामील झाला, जो या लिलावातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर १३ वर्षांचा खेळाडू वैभव सूर्यवंशीसाठी पहिल्याच लिलावात कोट्यवधींची बोली लागली.
IPL Mega Auction 2025 Day 2 Highlights: आयपीएल २०२५ महालिलावाच्या दुसऱ्या दिवसाच्या हायलाईट्स
IPL Live Updates: मुशीर खान, सूर्यांश शेडगे
पंजाब किंग्सने मुंबई क्रिकेट संघाचा खेळाडू मुशीर खान आणि सूर्यांश शेडगेला मूळ किंमत ३० लाखांसह संघात घेतले.
IPL Live Updates: मुंबई इंडियन्स
भारताचा अनकॅप्ड खेळाडू राज अंगद बावा साठी मुंबईने २० लाखांच्या मूळ किमतीसह संघात घेतलं.
IPL Live Updates: शमार जोसेफ
शमार जोसेफला ७५ लाखांवर बोली लावत मुंबई इंडियन्सने संघात सामील केलं होतं. पण लखनौने त्याला आरटीएम वापरत संघात कायम ठेवलं.
IPL Live Updates: नॅथन एलिस
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नॅथन एलिसवर पंजाब आणि चेन्नईकडून बोली लावली जात होती. पंजाबकडे आरटीएमची संधी होती, पण त्यांनी नकार देताच २ कोटींना नॅथन एलिस चेन्नई संघाचा भाग झाला.
IPL Live Updates: कामिंदु मेंडिस
श्रीलंकेचा शतकांवर शतकं करणारा कामिंदु मेंडिस याला हैदराबाद संघाने ७५ लाखांना संघात खरेदी केलं.
IPL Live Updates: अॅरोन हार्डी
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू अॅरोन हार्डीला पंजाब किंग्सने १.२५ कोटींना संघात खरेदी केले.
IPL Live Updates: हैदराबाद
इंग्लंडचा अनकॅप्ड अष्टपैलू खेळाडू ब्रेडॉन कर्स याला १ कोटींना संघात सामील केले.
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू जॅकब बेथेल याच्यावर याला २.६० कोटींना आरसीबीच्या ताफ्यात दाखल झाला आहे.
? आला रे ?
— Mumbai Indians (@mipaltan) November 25, 2024
Shrijith Krishnan | ??
?: 30 L#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPLAuction
कर्नाटक संघाकडून खेळणारा यष्टीरक्षक फलंदाज श्रीजीत कृष्णन ३० लाख मूळ किमतीसह मुंबईच्या ताफ्यात दाखल.
IPL Live Updates: प्रियांश आर्या
भारताचा अनकॅप्ड खेळाडू दिल्लीकडून खेळणारा अष्टपैलू प्रियांश आर्या याच्यावर आरसीबी आणि पंजाब यांच्यात बोलींचा मुकाबला सुरू होता. अखेरीस पंजाबने त्याला ३.८० कोटींना संघात सामील केले.
IPL Live Updates: कुलदीप सेन
भारताचा गोलंदाज कुलदीप सेन ला ८० लाखांना पंजाब किंग्स संघाने खरेदी केलं आहे.
IPL Live Updates: रीस टोप्ले
मुंबई इंडियन्स संघाने रीस टोप्लेला ७५ लाखांना संघात सामील केले आहे.
IPL Live Updates: फझलहक फारूकी
फझलहक फारूकीला २ कोटीमध्ये राजस्थान रॉयल्सने संघात सामील केलं आहे.
IPL Live Updates: जयंत यादव
जयंत यादवला मूळ किमतीसह ७५ लाखात गुजरातने संघात सामील केलं आहे.
न्यूझीलंडचा उत्कृष्ट फिरकीपटू मिचेल सँटनरला त्याच्य मूळ किमतीसह २ कोटींना मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतले आहे. मुंबईच्या ताफ्यात एक उत्कृष्ट फिरकीपटू आल्याने संघ अधिक मजबूत झाल आहे.
Part-time New Zealand cricketer, full-time golfer, now for Mumbai Indians ?
— Mumbai Indians (@mipaltan) November 25, 2024
Bio: updated ?#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPLAuction pic.twitter.com/HGFhpaBqFg
IPL Live Updates: गुरजपनीत सिंग
गुरजपनीत सिंग त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. आयपीएल लिलावात त्याच्यावर चेन्नई आणि लखनौ आणि मग गुजरातने बोली लावली होती. २.२० कोटींना अखेरीस चेन्नईने संघात सामील केलं.
IPL Live Updates: आकाश सिंह
आकाश सिंह अनकॅप्ड अष्टपैलू खेळाडू मूळ किमतीला लखनौने ताफ्यात सामील केलं.
IPL Live Updates: अश्वनी कुमार
भारताचा अनकॅप्ड अष्टपैलू खेळाडू अश्वनी कुमारला मुंबई इंडियन्सने ३० लाखांच्या मूळ किमतीसह संघात सामील केलं आहे.
IPL Live Updates: युधवीर सिंह
अनकॅप्ड अष्टपैलू युधवीर सिंगला राजस्थान रॉयल्सने ३५ लाखांना संघात सामील केले.
IPL Live Updates: पंजाब किंग्स
पंजाब किंगसने फिरकीपटू हरनूर पन्नाला मूळ किंमत ३० लाखांसह संघात सामील केले.
IPL Live Updates: जयदेव उनाडकट
जयदेव उनाडकट मूळ किमतीसह त्याच्या जुन्या संघात हैदराबादमध्ये सामील झाला आहे.
IPL Live Updates: नुवान तुषारा
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषारावर राजस्थान आणि आरसीबीमध्ये बोली लावण्याचा मुकाबला सुरू होता. अखेरीस आरसीबीने बाजी मारत तुषाराला १.६० कोटींना संघात सामील केलं.
IPL Live Updates: इशांत शर्मा
गुजरात टायटन्स संघाने इशांत शर्माला ७५ लाखांच्या मूळ किमतीसह संघात सामील केले.
उमरान मलिक, मुस्तफिजूर रहमान लिलावाच्या सुरूवातीला अनसोल्ड
IPL Live Updates: स्पेन्सर जॉन्सन
केकेआर पंजाबमध्ये ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनवर बोली सुरू होती. अखेरीस केकेआरने २.८० कोटींना संघात खरेदी केले.
IPL Live Updates: साई किशोर
साई किशोरला गुजरातने २ कोटींना संघात सामील केले.
IPL Live Updates: रोमारियो शेफर्ड
मुंबईकडून अखेरच्या षटकात धुव्वाधार फटकेबाजी करणारा रोमारियो शेफर्ड १.५ कोटींना आरसीबीच्या ताफ्यात सामील झाला.
IPL Live Updates: अजमतुल्ला उमरजाई
पंजाब किंग्सने अझमतुल्ला उमरजाईला २.४ कोटींना संघात सामील केले.
IPL Live Updates: विल जॅक्स
आरसीबीकडून धुव्वाधार शतक झळकावणारा विल जॅक्ससाठी मुंबई आणि पंजाबमध्ये बोलींचा मुकाबला सुरू होता. अखेरीस मुंबई संघाने बाजी मारत विल जॅक्सला 5.25 कोटींना संघात सामील केलं आहे. आरसीबीने आरटीएमला नकार देताच विल जॅक्स मुंबईत सामील.
IPL Live Updates: दीपक हुडा
दीपक हुडा १.७० कोटींसाटी चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात सामील झाला आहे.