IPL 2025 RCB vs SRH Highlights: लखनऊच्या एकाना स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये दमदार लढत पाहायला मिळाली. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पहिल्या डावात फलंदाजी करताना २३१ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा डाव १८९ धावांवर आटोपला. यासह हा सामना ४२ धावांनी गमावला आहे.

Live Updates
23:38 (IST) 23 May 2025

RCB vs SRH Live: आरसीबीने हातचा सामना गमावला! हैदराबादचा बंगळुरूवर मोठा विजय

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजयासाठी २३२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना संपूर्ण डाव १८९ धावांवर आटोपला. यासह हैदराबादने हा सामना ४२ धावांनी आपल्या नावावर केला आहे.

23:11 (IST) 23 May 2025

RCB vs SRH Live: ईशान मलिंगाची हवा

आधी रनआऊट आणि त्यानंतर ईशान मलिंगाने आक्रमक फलंदाज शिमरोन रुदरफोर्डला बाद करत माघारी धाडलं आहे.

23:09 (IST) 23 May 2025

RCB vs SRH Live: मोक्याच्या क्षणी रजत पाटीदार रनआऊट; RCB च्या अडचणी वाढल्या

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ विक्रमी धावांचा पाठलाग करण्याच्या जवळपास पोहोचला आहे. पण, रजत पाटीदार रनआऊट होऊन माघारी परतला आहे.

22:45 (IST) 23 May 2025

RCB vs SRH Live: हैदराबादचं दमदार कमबॅक! विराट पाठोपाठ सॉल्ट परतला तंबूत

विराट कोहली बाद होऊन माघारी परतल्यानंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. फिल सॉल्ट ६२ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.

22:37 (IST) 23 May 2025

RCB vs SRH Live: आरसीबीला विजयासाठी ६० चेंडूत इतक्या धावांची गरज

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ६० चेंडूत ११४ धावांची गरज आहे.

22:20 (IST) 23 May 2025

RCB vs SRH Live: आरसीबीला पहिला धक्का! विराट कोहली परतला तंबूत

विराट कोहली आणि फिल सॉल्टची जोडी चांगलीच जमली होती. मात्र, विराट ४३ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.

22:14 (IST) 23 May 2025

RCB vs SRH Live: पावरप्ले

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला हा सामना जिंकण्यासाठी २३२ धावा करायच्या आहेत. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फिल सॉल्टने दमदार सुरूवात करून दिली आहे. दोघांनी मिळून पावरप्लेमध्ये ७२ धावा केल्या आहेत.

22:01 (IST) 23 May 2025

RCB vs SRH Live: आरसीबीची दमदार सुरूवात! विराट – सॉल्टची जोडी जमली

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. या धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी दमदार सुरूवात करून दिली आहे.

21:24 (IST) 23 May 2025
LSG vs RCB Live: छोटा पॅकेट, बडा धमाका! ईशान किशनचं शतक थोडक्यात हुकलं; हैदराबादने RCB समोर ठेवलं मोठं आव्हान

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासमोर विजयासाठी २३२ धावांचं आव्हान ठेवलं आहे. ईशान किशनने या डावात फलंदाजी करताना नाबाद ९४ धावांची खेळी केली.

20:50 (IST) 23 May 2025

RCB vs SRH Live: शेफर्डच्या दुसऱ्याच चेंडूवर नितीश रेड्डीची बत्ती गुल; हैदराबादचा निम्मा संघ तंबूत

आपले पहिले षटक टाकण्यासाठी आलेल्या रोमारियो शेफर्डने दुसऱ्याच चेंडूवर नितीश कुमार रेड्डीला बाद करत माघारी धाडलं आहे.

20:45 (IST) 23 May 2025

RCB vs SRH Live: ईशान किशनचं अर्धशतक पूर्ण

आपल्या पहिल्याच सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या ईशान किशनने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरूद्ध सुरू असलेल्या सामन्यात सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी केली आहे.

20:21 (IST) 23 May 2025

RCB vs LSG Live: ईशान- क्लासेनची जोडी तुटली ! हैदराबादचे ३ प्रमुख फलंदाज तंबूत

हैदराबादला तिसरा मोठा धक्का बसला आहे. हेनरिक क्लासेन २४ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.

19:55 (IST) 23 May 2025

RCB vs SRH: हैदराबादची सलामी जोडी तंबूत! अभिषेक शर्मा- हेड स्वस्तात माघारी

सनरायझर्स हैदराबादला लागोपाठ दोन मोठे धक्के बसले आहेत. संघाची सलामी जोडी स्वस्तात माघारी परतली आहे. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हीस हेड दोघेही बाद होऊन माघारी परतले आहेत.

19:52 (IST) 23 May 2025

RCB vs SRH Live: हैदराबादला पहिला मोठा धक्का! अभिषेक शर्मा स्वस्तात माघारी

हैदराबादला पहिला मोठा धक्का बसला आहे. संघातील आक्रमक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा स्वस्तात माघारी परतला आहे.

19:04 (IST) 23 May 2025

RCB vs SRH Live: आरसीबीचा कर्णधार बदलला! बंगळुरूचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय

या सामन्यात रजत पाटीदारऐवजी जितेश शर्मा नाणेफेकीसाठी आला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.