आयपीएल २०२५ चा यंदा १८वा सीझन सुरू आहे. १८व्या सीझन क्रिकेटप्रेमींना नवा विजेता संघ मिळणार आहे. पंजाब किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आपली पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. हा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघ नव्या कर्णधारांच्या नेतृत्त्वात चांगली कामगिरी करत आहेत.

पंजाब संघही श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील व प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगच्या मार्गदर्शनाखाली शानदार फॉर्मात खेळत आहे. या कर्णधार-प्रशिक्षक जोडीने २०१४ नंतर पंजाबला पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचवले आणि एकूणच त्यांचा हा दुसरा संघ आहे. तर रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने एक कमालीची कामगिरी केली आहे. लीग टप्प्यानंतर संघाने गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आणि नंतर क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्स संघाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

गेल्या १८ हंगामांमध्ये कोणकोणते संघ चॅम्पियन ठरले आहेत, जाणून घेऊया. राजस्थान रॉयल्स हे २००८ चे पहिले आयपीएल चॅम्पियन आहेत. त्यांनी चेन्नई सुपर किंग्जचा तीन विकेट्सने पराभव करून पहिला चषक जिंकला. २००९ मध्ये, डेक्कन चार्जर्स (सध्या स्पर्धेत नाही) यांनी अंतिम सामन्यात आरसीबीचा पराभव करून जेतेपद जिंकले. कोलकाता नाईट रायडर्स हे आयपीएलचे सर्वात अलीकडील विजेते आहेत. त्यांनी २०२४ च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला.

२००८ ते २०२४ दरम्यान आयपीएलची जेतेपदं जिंकणारे संघ

वर्षविजेता संघउपविजेता संघठिकाण
२००८राजस्थान रॉयल्सचेन्नई सुपर किंग्समुंबई
२००९डेक्कन चार्जर्सरॉयल चॅलेंजर्स बंगळुरूजोहान्सबर्ग
२०१०चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्समुंबई
२०११चेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचेन्नई
२०१२कोलकाता नाईट रायडर्सचेन्नई सुपर किंग्सचेन्नई
२०१३मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सकोलकाता
२०१४कोलकाता नाईट रायडर्सकिंग्स इलेव्हन पंजाबबंगळुरू
२०१५मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सकोलकाता
२०१६सनरायझर्स हैदराबादरॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबंगळुरू
२०१७मुंबई इंडियन्सरायझिंग पुणे सुपरजायंट्सहैदराबाद
२०१८चेन्नई सुपर किंग्ससनरायझर्स हैदराबादमुंबई
२०१९मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सहैदराबाद
२०२०मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्सदुबई
२०२१चेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्सदुबई
२०२२गुजरात टायटन्सराजस्थान रॉयल्सअहमदाबाद

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहेत. ज्यांनी तब्बल ५ वेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे.

आयपीएलची सर्वाधिक जेतेपद जिंकणारे संघ

मुंबई इंडियन्स – ५ जेतेपद – २०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२०,
चेन्नई सुपर किंग्स – ५ जेतेपद – २०१०, २०११, २०१८, २०२१, २०२३
कोलकाता नाईट रायडर्स – ३ जेतेपद – २०१२, २०१४, २०२४
राजस्थान रॉयल्स – १ जेतेपद – २०१६
डेक्कन चार्जर्स – १ जेतेपद – २००८
गुजरात टायटन्स – १ जेतेपद – २०२२