दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२३च्या ६४व्या सामन्यात चेन्नईने मोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २२४ धावा केल्या. दिल्लीला केवळ १४६ धावा करता आल्या. चेन्नईने दिल्लीवर ७७ धावांनी मात केली. या विजयासह चेन्नई प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे. या विजयामुळे धोनीच्या कर्णधारपदाची पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात चर्चा होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तविक, दिल्लीच्या डावात धोनीने आपल्या गोलंदाजांचा चांगला वापर केला. जडेजाला समजावताना धोनीचा आवाज स्टंपच्या माईकमध्ये अडकला. जो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. चेन्नईसाठी जडेजा दहावे षटक करत होता. यादरम्यान वॉर्नर त्याला षटकार आणि चौकार मारत होता. धोनीने जडेजाला विकेटच्या मागून अनेक वेळा टिप्स दिल्या.

स्टंप माइकमध्ये एम.एस. धोनीचा आवाज कैद

धोनी पहिल्यांदाच म्हणाला, “यही मारने को देखेंगा”…. वॉर्नरने बाऊंड्री मारल्यावर धोनीने पुन्हा जडेजाला समजावलं… “चलेगा कोई दिक्कत नहीं है”… यानंतरही वॉर्नरच्या बॅटमधून धावा आल्यावर धोनीने पुन्हा जडेजाला टिप्स दिल्या. यावेळी धोनी म्हणाला, “सर इधर रख लो…आँख बंद करके नहीं घुमाएगा फिर, इधर मारा तो ठीक है.” पुढे तो म्हणाला की, “अब मे जादा हिंदी नाही बोल सकता.”

चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफसाठी पात्र

उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवेसह सीएसकेचे गोलंदाज देखील चमकदार कामगिरी करताना दिसले. ऋतुराजने ५० चेंडूत ७९ धावा केल्या, तर कॉनवेने ५२ चेंडूत ८७ धावांची सर्वोत्तम खेळी केली. गोलंदाजी विभागात दीपक चाहर सर्वात यशस्वी ठरला. चाहरने ४ षटकात २२ धावा खर्च करून ३ विकेट्स घेतल्या. महिशा थिक्षणा आणि मथिशा पथिराना यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तुषार देशपांडे आणि रविंद्र जडेजा यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. प्रत्युत्तरात दिल्लीला १४६ धावांवर समाधान मानावे लागले. सीएसकेने हा सामना ७७ धावांनी जिंकला आणि फ्लेऑफमध्ये जागा पक्की केली.

हेही वाचा: IPL Playoffs Equation: जागा एक दावेदार तीन! मुंबई, बंगळुरू की राजस्थान कोणाला मिळणार प्ले ऑफचे तिकीट? जाणून घ्या समीकरण

चेन्नईने दिल्लीचा ७७ धावांनी पराभव करून नेट रनरेटमध्ये मोठी सुधारणा केली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. सध्या १४ सामन्यांत ८ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईचे १७ गुण आहेत. शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात लखनऊने मोठा विजय नोंदवला तर तो दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. तसे झाले नाही तर चेपॉक येथील पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईचा सामना गुजरातशी होईल.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl2023 ms dhonis voice captured in stump mic tips given to sir jadeja from behind the wicket avw