Mumbai Indians vs Gujarat Titans Highlights , 25 April 2023 : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ३५ वा सामना आज सायंकाळी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी धडाकेबाज फलंदाजी करून २० षटकांत ६ विकेट्स गमावत २०७ धावांपर्यंत मजल मारली. मात्र, या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची मात्र पुरती दमछाक झाली. राशिद खान आणि नूर अहमदच्या अप्रतिम गोलंदाजीमुळं मुंबई इंडियन्सची दाणादाण उडाली. त्यामुळे मुंबई इंडियन्सने २० षटकात ९ विकेट्स गमावत १५२ धावा केल्या. त्यामुळे गुजरात टायन्सचा या सामन्यात ५५ धावांनी विजय झाला.
मुंबईसाठी रोहित शर्माने (२), ईशान किशन (१३), कॅमरून ग्रीन (३३), तिलक वर्मा (२), सूर्यकुमार यादव (२३), टीम डेविड (0), पीयुष चावलाने १८ धावा केल्या. गुजरातच्या नूर अहमदने चार षटकात ३७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसंच राशीद खानने चार षटकात २७ धावा देत २ विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्याने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला बाद केलं. मुंबईच्या नेहल वढेरा २१ चेंडूत ४० धावांवर बाद झाला. अर्जुन तेंडुलकर १३ धावा करून तंबूत परतला.
गुजरातच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शुबमन गिलने अप्रतिम फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली. मुंबईच्या कुमरच्या गोलंदाजीवर शुबमन ५६ धावांवर बाद झाल्यानंतर अभिनव मनोहरने धडाकेबाज फलंदाजी केली. अभिनव २० चेंडूत ४२ धावा करून रिलेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. मात्र, डेविड मिलरने आक्रमक फलंदाजी करून धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. डेविड मिलरने २२ चेंडूत ४६ धावा कुटल्या. तर राहुल तेवतियाने ५ चेंडूत २० धावांची खेळी साकारली. या धावांच्या जोरावर गुजरात टायटन्सने २० षटकात ६ विकेट्स गमावत २०७ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे मुंबई इंडियन्सला विजयासाठी २०८ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार होतं.
Mumbai Indians vs Gujarat Titans Highlights Updates
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात जोरदार लढत होणार आहे.
आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ३५ वा सामना आज सायंकाळी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी धडाकेबाज फलंदाजी करून २० षटकांत ६ विकेट्स गमावत २०७ धावांपर्यंत मजल मारली. मात्र, या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची मात्र पुरती दमछाक झाली. राशिद खान आणि नूर अहमदच्या अप्रतिम गोलंदाजीमुळं मुंबई इंडियन्सची दाणादाण उडाली. त्यामुळे मुंबई इंडियन्सने २० षटकात ९ विकेट्स गमावत १५२ धावा केल्या. त्यामुळे गुजरात टायन्सचा या सामन्यात ५५ धावांनी विजय झाला.
Inching closer to victory, the @gujarat_titans!#MI 8 down now.
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2023
Follow the match ▶️ https://t.co/PXDi4zeBoD#TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/gmhZ2lTDUI
गुजरात टायटन्सचा फिरकीपटू राशिद खान अप्रतिम गोलंदाजी करत असून मुंबईच्या तीन महत्वाच्या फलंदाजांना बाद करण्यात राशिदला यश आलं. ईशान किशन, तिलक वर्मा आणि कॅमरून ग्रीनलाही राशिदने बाद केलं. त्यानंतर नूर अहमदच्या गोलंदाजीवर टीम डेविड शून्यावर बाद झाला. ११ षटकानंतर मुंबईची धावसंख्या ५९-५ अशी झाली आहे. १२ षटकानंतर मुंबईची धावसंख्या ७५-५ अशी झाली आहे. नूरच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादव २३ धावांवर बाद झाल्याने मुंबईला मोठा धक्का बसला. १३ षटकानंतर मुंबईची धावसंख्या ९०-६ वर पोहोचली आहे. १४ षटकानंतर मुंबईची धावसंख्या ९९-६ झालीय. १६ षटकानंतर मुंबईची धावसंख्या १२९-६ वर पोहोचली आहे. मुंबईची धावसंख्या १३७-८ अशी झालीय.
Cameron Green ✅
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2023
Tim David ✅
Further trouble for Mumbai Indians as Noor Ahmad scalps two wickets in an over ??
Follow the match ▶️ https://t.co/PXDi4zeBoD#TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/p9sJhipW1X
गुजरातच्या राशिद खानने मुंबईच्या ईशान किशन आणि तिलक वर्माला बाद करून गुजरातला ब्रेक थ्रू दिला. मुंबईच्या दोन महत्वाच्या फलंदाजांना बाद करून गुजरातने सामन्यात वापसी केली आहे. आठ षटकानंतर मुंबईची धावसंख्या ४५- ३ अशी झाली आहे. ९ षटकानंतर मुंबई ५३-३ वर पोहोचली आहे. दहा षटकानंतर मुंबईची धावसंख्या ५९-३ झाली आहे. राशिद खानने कॅमरून ग्रीनला ३३ धावांवर बाद केलं.
Double strike alert ⚡️⚡️@rashidkhan_19 gets Ishan Kishan and Impact Player Tilak Varma to put #GT on ?
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2023
Follow the match ▶️ https://t.co/PXDi4zeBoD#TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/pCNW1wUYSK
गुजरात टायटन्सने २०८ धावांचं आव्हान दिल्यानंतर मुंबईचे फलंदाज धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर ईशान किशन आणि कॅमरून ग्रीन मुंबईची कमान सांभाळत आहेत. परंतु, फलकावर मोठी धावसंख्या उभारण्यासाठी या फलंदाजांना संघर्ष करावा लागत आहे. सहा षटकानंतर मुंबईची धावसंख्या ३३-१ झालीय. राशिद खानच्या गोलंदाजीवर ईशान किशन २१ चेंडूत १३ धावा करून बाद झाला आणि मुंबईला दुसरा धक्का बसला.
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला अवघ्या दोन धावांवर बाद केलं. मुंबईला मोठा धक्का बसला असून मैदानात ईशान किशन आणि कॅमरून ग्रीन मुंबईची कमान सांभाळत आहे. तीन षटकानंतर मुंबईची धावसंख्या तीन षटकानंतर ६-१ अशी झालीय. चार षटकानंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या १८-१ झाली आहे. पाच षटकानंतर मुंबईची धावसंख्या २६-१ अशी झाली आहे.
गुजरात टायटन्सने २० षटकांत साह विकेट्स गमावत २०७ धावांचा पल्ला गाठला. त्यामुळे मुंबईला विजयासाठी २०८ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे. रोहित शर्मा आणि ईशान किशन या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरले असून एका षटकानंतर मुंबईची धावसंख्या बिनबाद २-० झाली.
गुजरातच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शुबमन गिलने अप्रतिम फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली. मुंबईच्या कुमरच्या गोलंदाजीवर शुबमन ५६ धावांवर बाद झाल्यानंतर अभिनव मनोहरने धडाकेबाज फलंदाजी केली. अभिनव २० चेंडूत ४२ धावा करून रिलेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. मात्र, डेविड मिलरने आक्रमक फलंदाजी करून धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. डेविड मिलरने २२ चेंडूत ४६ धावा कुटल्या. तर राहुल तेवतियाने ५ चेंडूत २० धावांची खेळी साकारली. या धावांच्या जोरावर गुजरात टायटन्सने २० षटकात ६ विकेट्स गमावत २०७ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे मुंबई इंडियन्सला विजयासाठी २०८ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.
2️⃣2️⃣ runs off the 18th over ??
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2023
Abhinav Manohar departs after a quick-fire 42(21) ??
Follow the match ▶️ https://t.co/PXDi4zeBoD#TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/kmfrCcEXir
गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल मुंबई इंडियन्सचा गोलंदाज कुमरच्या गोलंदाजीवर बाद झाला. शुबमनने ३४ चेंडूत ५६ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. यामध्ये ७ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. १२ षटकानंतर गुजरातची धावसंख्या ९९-३ अशी झाली. परंतु तेराव्या षटकात पीयुष चावलाने विजय शंकरला १९ धावांवर बाद केलं अन् गुजरातला चौथा धक्का बसला. तेरा षटकानंतर गुजरातची धावसंख्या १०३-४ अशी झालीय. पंधरा षटकानंर गुजरातची धावसंख्या १३०-४ झालीय. १६ षटकानंतर गुजरातची धावसंख्या १३७-४ झाली आहे. १८ षटकानंतर गुजरातची धावसंख्या १७२-५ झालीय.
Releasing pressure, the @ShubmanGill way ✅
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2023
Some crisp shots in there ?
WATCH ?? #TATAIPL | #GTvMI https://t.co/rPZnSKvnat
गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने अप्रतिम फलंदाजी करत ३० चेंडूत ५० धावांची खेळी साकारत अर्धशतक ठोकलं. त्यामुळे १० षटकानंतर गुजरातची धावसंख्या ८५- २ अशी झालीय.
Half-century number 1️⃣7️⃣ for @ShubmanGill ?
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2023
He's in fine touch as @gujarat_titans move to 84/2 at the halfway stage ??
Follow the match ▶️ https://t.co/PXDi4zeBoD#TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/rAUftUHMYN
गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज ऋद्धीमान साहा ४ धावांवर बाद झाल्यानंतर शुबमन गिल आणि हार्दिक पांड्याने सावध खेळी करत चौफेर फटकेबाजी केली, त्यामुळे सहा षटकानंतर गुजराताची धावसंख्या ५०-१ अशी झाली होती. परंतु, पीयुष चावलाच्या गोलंदाजीवर गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या १३ धावांवर बाद झाला. सात षटकानंतर गुजरातची धावसंख्या ५५-२ अशी झालीय. ८ षटकानंतर गुजरातची धावसंख्या ६०-२ अशी झालीय.
BIG wicket!
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2023
Piyush Chawla gets the #GT skipper ??@surya_14kumar with a fine catch near the ropes ??
Follow the match ▶️ https://t.co/PXDi4zeBoD#TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/o4amWH6Vxe
अर्जुन तेंडुलकरने भेदक मारा करून ऋद्धीमान साहाला ४ धावांवर असताना बाद केलं. मुंबई इंडियन्सला पॉवर प्ले मध्ये अर्जुनने पहिली विकेट मिळवून दिली. साहा ७ चेंडूत ४ धावा करत तंबूत परतला. तीन षटकानंतर गुजरातची धावसंख्या १७-१ अशी झालीय. चार षटकानंतर गुजरात २३-१ वर पोहोचला आहे. पाच षटकानंतर गुजरातची धावसंख्या ३३-१ झाली आहे.
There's the first wicket for @mipaltan ??
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2023
Arjun Tendulkar with the opening breakthrough ??
Wriddhiman Saha departs for 4.
Follow the match ▶️ https://t.co/PXDi4zeBoD#TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/Y0i3UrfeBn
गुजरात टायटन्सचे सलामीवर फलंदाज ऋद्धीमान साहा आणि शुबमन गिल मैदानात उतरले असून पहिल्या षटकात गुजरातची धावसंख्या बिनबाद ४ झाली आहे. अर्जुन तेंडुलकरने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केल्यानं गुजरातला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दोन षटकानंतर मुंबईची धावसंख्या १२-० अशी झाली आहे.
Let's Play!
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2023
ACTION Time in Ahmedabad ?
Follow the match ▶️ https://t.co/PXDi4zeBoD#TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/tRHCbPPekl
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलचा ३५ वा सामना होत आहे. तत्पूर्वी मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वधेरा, ऋतिक शौकीन, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, जेसन बेहरनडॉर्फ</p>
इम्पॅक्ट प्लेअर : विष्णू विनोद, रमनदीप सिंह, पियुष चावला, शम्स मुल्लानी
गुजरात टायट्नस : शुभमन गिल, वृद्धीमान साहा (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, विजय शंकर, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर मोहम्मद, मोहित शर्मा
इम्पॅक्ट प्लेअर : साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, शिवम मावी
आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ३५ वा सामना आज सायंकाळी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. आयपीएलमध्ये गुजरात आणि मुंबईचा हा दुसरा सामना असून हार्दिक पांड्या विरुद्ध रोहित शर्मा आमने-सामने येणार आहेत. मागील हंगामात दोन्ही संघामध्ये लढत झाली होती. तेव्हा मुंबई इंडियन्सने सामन्यात बाजी मारली होती. परंतु, पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या मागील सामन्यात मुंबईचा पराभव झाला होता. आज अहमदाबादमध्ये मुंबई इंडियन्सचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सशी होणार आहे. दरम्यान, या सामन्यात मुंबई इंडियन्स पराभवाचं सावट दूर करून पुन्हा विजयी घौडदौड घेते का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Up next ⏳@gujarat_titans ? @mipaltan
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2023
?Ahmedabad
Are you ready for another captivating clash in #TATAIPL 2023 ❓ #GTvMI pic.twitter.com/vjGWJRxDkI
मुंबई इंडियन्स वि गुजरात टायटन्स लाइव्ह क्रिकेट स्कोअर
Mumbai Indians vs Gujarat Titans Highlights Updates
अहमदाबादमध्ये होणाऱ्या सामन्या कोणता संघ विजयी घौडदौड सुरु ठेवणार? पाहा लाईव्ह अपडेट्स