Lalit Yadav taking an amazing catch of Ajinkya Rahane: आयपीएल २०२३ च्या ५५ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स खेळला जात आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १६७ धावा केल्या . त्याचबरोबर दिल्लीसमोर १६८ धावांचे लक्ष्य ठेवले. या डावा दरम्यान ललित यादवने एक अप्रतिम झेल पकडला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्णधार डेव्हिड वॉर्नरने १२व्या षटकात ललित यादवकडे चेंडू सोपवला. ललित यादवने पहिल्याच चेंडूवर धडाकेबाज फलंदाज अजिंक्य रहाणे पॅव्हेलियनमध्ये परतला. रहाणेला ललित यादवने ज्या पद्धतीने बाद केले, त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

वास्तविक, ललितने पहिला चेंडू ग्राउंड फुलर टाकला, ज्यावर रहाणेने पुढे जाऊन शॉट खेळला. बॅटला लागल्यानंतर चेंडू फारसा उंच उडाला नाही आणि गोलंदाजाच्या दिशेला गेला. चेंडू खेळपट्टीच्या पलीकडे जाण्यापूर्वी ललितने उजवीकडे वेगाने डायव्हिंग केले आणि एका हाताने झेल पकडला. ललिलतने आपल्याच गोलंदाजीवर अवघ्या दोन बोटात झेल पकडला. हा झेल घेतल्यानंतर क्षणभर कोणाचाही विश्वास बसला नाही की त्याने झेल घेतला आहे. ललितच्या शानदार फिल्डिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

सामन्याबद्दल बोलयाचे, तर चेन्नईसाठी या सामन्यात एकाही फलंदाजाने ३० धावांचा टप्पा ओलांडला नाही. शिवम दुबेने १२ चेंडूत सर्वाधिक २५ धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने २४, अंबाती रायडूने २३, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणेने २१-२१ धावा केल्या. डेव्हॉन कॉनवेने १० आणि मोईन अलीने सात धावा केल्या.

हेही वाचा – IPL 2023: गुजरात टायटन्स १५ मे रोजी लॅव्हेंडर रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार, कारण जाणून तुम्हाला होईल आनंद

कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या षटकात वेगवान धावा केल्या. त्याने नऊ चेंडूत २० धावा केल्या. यादरम्यान त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले. दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल मार्शने तीन आणि अक्षर पटेलने दोन विकेट घेतल्या. खलील अहमद, ललित यादव आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The video of lalit yadav taking an amazing catch of ajinkya rahane is viral on social media vbm