Tanush Kotian IPL Debut : आयपीएल २०२४ मधील २७ वा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुल्लानपूर येथे खेळला जात आहे. आज दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बरेच बदल पाहायला मिळत आहेत. जोस बटलर आणि आर अश्विन राजस्थान रॉयल्सच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहेत, तर यशस्वी जैस्वालला या सामन्यासाठी प्रभावशाली खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे. याशिवाय राजस्थान संघात एका नव्या युवा खेळाडूचा प्रवेश झाला आहे. होय, आम्ही तनुष कोटियनबद्दल बोलत आहोत, ज्याला दुसरा हार्दिक पंड्या देखील म्हटले जाते. आर अश्विनच्या जागी या खेळाडूचा संघात समावेश करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहे तनुष कोटियन?

मुंबईकर असलेल्या तनुष कोटियनचा प्लेइंगमध्ये समावेश करण्यात आला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या कोटियनने अलीकडेच रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईसाठी चमकदार कामगिरी केली होती. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात बॉल आणि बॅटने महत्त्वपूर्ण योगदान देण्यात कोटियन यशस्वी ठरला होता. त्याला आयपीएल २०२४ च्या लिलावात कोणत्याही संघांनी बोली लावली नव्हती. त्यामुळे निराशा झाला होता.

यानंतर ॲडम झाम्पा वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलमधून बाहेर पडल्याने राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे आयपीएलच्या १७व्या हंगाम सुरू होण्याच्या काही तासांपूर्वी राजस्थान रॉयल्सने २० लाखांच्या मूळ किमतीसाठी तनुष कोटियनला संघात सामील करुन घेतले. तनुष कोटियनला २३ टी-२० आणि २६ प्रथम श्रेणी सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याने १९ ए लिस्ट सामने खेळले आहेत. तनुष हा मुंबई संघाचा प्रथम श्रेणी क्रिकेटचा ‘रायझिंग स्टार’ आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2024 साठी मोहम्मद कैफने निवडला संघ, अश्विन ऐवजी ‘या’ खेळाडूला दिले स्थान, पाहा संपूर्ण संघ

दहाव्या क्रमांकावर झळकावले होते शतक –

तनुष कोटियनने अलीकडेच विदर्भाविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईकडून खेळताना चमकदार कामगिरी केली होती. रणजीच्या हंगामात तनुषने आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर १० सामन्यांत २९ विकेट्स घेतल्या होत्या. या काळात त्याची गोलंदाजीची सरासरी १६.९६ होती. कोटियनने फलंदाजीतही भरपूर धावा केल्या होत्या. या रणजी हंगामात त्याने १० सामन्यात ४१ च्या सरासरीने ५०२ धावा केल्या. दहाव्या क्रमांकावर खेळताना बडोद्याविरुद्ध त्याने १२० धावांची नाबाद खेळी खेळली. कोटियनने तामिळनाडूविरुद्धच्या उपांत्य फेरीत ८९ धावांची खेळी केली साकारली होती. तनुष कोटियनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ८ सामन्यात ९ विकेट्स घेतल्या होत्या. नोव्हेंबर २०२२ मध्ये त्याने हिमाचल प्रदेशविरुद्धच्या अंतिम सामन्यात षटकार मारून मुंबईला चॅम्पियन बनवले होते. त्याचबरोबर कोटियनने विजेतेपदाच्या सामन्यात ३ विकेट्स घेतल्या होत्या.

हेही वाचा – IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा

राजस्थान रॉयल्सची प्लेइंग इलेव्हन –

संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, केशव महाराज, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is tanush kotian who made his ipl 2024 debut for rajasthan royals against punjab kings vbm