Ishan Kishan on World Cup: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्याच्या काही वेळापूर्वी मोठा दावा केला आहे. इशान किशन म्हणाला की, २०२३च्या विश्वचषकात जर कोणी त्याच्याविरुद्ध दोन धावा काढल्या तर तो त्याला धावबाद करेल. याशिवाय किशनने विकेटकीपिंग आणि फिल्डिंगमधील बदलांबाबतही सविस्तर उत्तरे दिली आहेत. तो आणखी काय म्हणाला? ते जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याआधी इशान किशन म्हणाला, “मी माझ्या थ्रोइंग आर्मवर खूप मेहनत घेत आहे. विश्वचषकात विरोधी संघातील खेळाडूंनी जर माझ्याकडून दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला तर मी त्यांच्यापैकी काही धावा काढण्याचा प्रयत्न करेन. मी अद्याप माझा सर्वोत्तम थ्रो फेकण्याचा प्रयत्न केलेला नाही, आशा आहे की मी विश्वचषकात ते मिळवू शकेन आणि काही जणांना रनआउट करू शकेन. विश्वचषकात माझ्याविरुद्ध कोणी २ धावा काढल्या तर मी त्यांना धावबाद नक्की करेन.”

किशन पुढे म्हणाला, “तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुम्ही या स्तरावर खेळत असता तेव्हा तुम्हाला खात्री नसते की तुम्ही कुठल्या क्रमांकावर फलंदाजी कराल. विशेषत: या संघात जिथे आपल्याकडे इतके चांगले फलंदाज आहेत. जेव्हा मी फलंदाजी करतो तेव्हा मला शक्य तितके आक्रमक फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतो कारण, मला खूप आवडते. मी माझ्या संघाला चांगली सुरुवात देऊ शकतो आणि मोठी भागीदारी करू शकतो. तसेच, जेव्हा तुम्ही मधल्या फळीत फलंदाजी करता तेव्हा तुम्हाला डाव पुढे घेऊन जाण्याची गरज असते.”

हेही वाचा: Pakistan World Cup Squad: वर्ल्डकपपूर्वी पीसीबी चिंताग्रस्त; दुखापतींवरून संघ निवड बैठकीत झाली झाडाझडती

इशान किशनने हे सांगून समारोप केला की, “तुम्हाला संघात तुमची भूमिका काय आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे आणि तुम्हाला परिस्थितीचे आकलन करणे आवश्यक आहे. तुम्‍हाला परिस्थिती पाहून समोरील आव्हाने पेलण्याची ताकद हवी. मी त्यानुसार फलंदाजी करण्‍याचा प्रयत्न करत आहे. जरी मी डाव सुरू केला तरी मला फारसा फरक पडत नाही. मी या क्रमांकावरही खेळलो आहे आणि माझे नियमित स्थानही सोडले आहे. त्यामुळे संघात कुठे खेळतो याने मला फारसा फरक पडत नाही. त्यावेळी परिस्थिती वाचणे आणि त्यानुसार खेळणे गरजेचे आहे.”

हेही वाचा: IND vs AUS 1st ODI: सिराज नंतर मोहम्मद शमीचा धमाका! कांगारुंविरोधात पंजा उघडला, ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ २७६ धावांवर बाद

ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २७७ धावांचे आव्हान ठेवले आहे

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वन डे सामना शुक्रवारी (२२ सप्टेंबर) मोहालीमध्ये खेळला जात आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्याच सामन्यात मोहम्मद शमी याने आपली गुणवत्ता दाखवून दिली. शमीने आज भारतासाठी सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघ ५० षटकांमध्ये टीम इंडियासमोर २७७ धावांचे आव्हान ठेवले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ishan kishan if anyone takes 2 runs against me in the world cup i will run out avw