KL Rahul 3000 runs Complete in Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डल गावस्कर ट्रॉफीला आजसपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय फलंदाजांची पुन्हा एकदा दाणादाण उडली पाहिला मिळाली. भारताने पहिल्या सत्रातच अवघ्या ५१ धावांत चार विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर संपूर्ण संघ १५० धावांत गारद झाला. भारताकडून ऋषभ पंत (३६) आणि नितीश रेड्डी (४१) यांनी सर्वाधिक धावा केल्या. या दरम्यान केएल राहुलने २६ धावांचे योगदान देताना एक विक्रम केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यात २६ धावांची इनिंग खेळूनही केएलने कसोटी क्रिकेटमध्ये मोठे स्थान मिळवले. या खेळीच्या जोरावर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या ३००० धावा पूर्ण केल्या. कसोटीच्या ९२व्या डावात त्याने हा विशेष टप्पा गाठला. अशाप्रकारे, कसोटीत भारतासाठी ३००० हून अधिक धावा करणारा तो सातवा सक्रिय क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी, कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या सक्रिय भारतीय क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश होता.

आता केएलनेही या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. केएलने ७४ चेंडूचा सामना करताना ३ चौकाराच्या मदतीने २६ धावा केल्या. मात्र, उपाहारापूर्वीच केएल मिचेल स्टार्कचा बळी ठरला. अशा प्रकारे त्याची छोटी पण महत्त्वपूर्ण खेळी संपुष्टात आली. केएल राहुलने भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये ५४ कसोटी सामन्यांमध्ये ३००७ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याची फलंदाजी सरासरी ३३.७८ आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने ८ शतकं झळकावली आहेत. २०१६ मध्ये चेन्नई येथे इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात १९९ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

हेही वाचा – Virat Kohli : ‘आता गंभीर निर्णय घेण्याची योग्य वेळ…’, विराटच्या फ्लॉप शोने वैतागलेल्या चाहत्यांची संतप्त प्रतिक्रिया

u

u

कसोटी क्रिकेटमध्ये ३००० हून अधिक धावा करणारे भारताचे सक्रिय खेळाडू –

  • विराट कोहली- ९०४५
  • चेतेश्वर पुजारा- ७१९५के
  • अजिंक्य रहाणे- ५०७७
  • रोहित शर्मा- ४२७०
  • आर अश्विन- ३४७३
  • रवींद्र जडेजा- ३२३५
  • केएल राहुल -३००७
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kl rahul becomes seventh active indian player to score 3000 runs in test cricket in ind vs aus 1st test at perth vbm