हितसंबंधाबद्दल बीसीसीआयचे लोकपाल डी.के.जैन यांनी पाठवलेल्या नोटीसीला सचिन तेंडुलकरने उत्तर दिलं आहे. ‘बीसीसीआय’च्या क्रिकेट सल्लागार समितीवर कार्यरत असताना सचिन इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मार्गदर्शक म्हणूनही कार्यरत असल्यामुळे त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. मात्र मुंबई इंडियन्सकडून आपल्याला कोणत्याही प्रकारचं मानधन मिळत नसून, संघाच्या निर्णय प्रक्रियेत आपण सहभागी नसल्याचं सचिनने म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी संजीव गुप्ता यांनी याप्रकरणी बीसीसीआयच्या लोकपालांकडे तक्रार केली होती. यानंतर सचिन आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मणला डी.के.जैन यांनी नोटीस पाठवली होती. याला उत्तर देताना सचिनने आपण मुंबई इंडियन्स संघात केवळ ICON या पदावर आहोत असं सांगितलं आहे. यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ आपल्याला कोणतही मानधन देत नसून संघाच्या निर्णय प्रक्रियेत आपला सहभाग नससल्याचं सचिनने म्हटलं आहे. त्यामुळे आपण बीसीसीसीआयच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं नसून हितसंबंधांचा आरोपही योग्य नसल्याचं सचिनने स्पष्ट केलंय.

अवश्य वाचा – IPL 2019 : चुकीचे निर्णय घ्याल तर संघाला फटका बसेलच – आंद्रे रसेल

सचिन, लक्ष्मण आणि गांगुली या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने जुलै २०१७ मध्ये भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदावर रवी शास्त्री यांची नियुक्ती केली. माजी न्यायमूर्ती जैन यांनी आपल्या नोटिशीत सचिन आणि लक्ष्मणला २८ एप्रिलपर्यंत लिखित उत्तर द्यायला सांगितले आहे. याचप्रमाणे ‘बीसीसीआय’लाही यासंदर्भात आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Receive no compensation from mi nor hold decision making role says sachin to bcci ombudsman