World Test Championship Final 2023: भारतीय स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत ३० डिसेंबर २०२२ रोजी कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. या अपघातात पंतच्या पायाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता मात्र ऋषभ पंत वेगाने बरा होत असून तो लवकरच मैदानात परतेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, पंतने स्वत: खुलासा केला की, तो क्रिकेटलाही मिस करत आहे. याबाबत त्याने एक ट्विट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विस्डेन इंडियाच्या ट्विटला पंतचे प्रत्युत्तर –

भारतीय संघ ७ जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे, ज्यामध्ये ऋषभ पंत खेळताना दिसणार नाही. पंत हा भारतीय संघाचा कसोटी क्रिकेटमधील महत्त्वाचा खेळाडू आहे. दरम्यान, ‘विस्डेन इंडिया’च्या ट्विटला उत्तर देताना पंत म्हणाला की, तो क्रिकेटलाही खूप मिस करत आहे. वास्तविक, विस्डेन इंडियाने ऋषभ पंतसाठी एक ट्विट केले होते, ज्यामध्ये लिहिले होते, “ऋषभ पंत, आम्हाला तुझी आठवण येते. खरे सांगायचे तर जगभरातील प्रत्येक क्रिकेटप्रेमी.”

पंतच्या अनुपस्थितीत डब्ल्यूटीसीमध्ये यष्टिरक्षक कोण असेल?

कसोटी क्रिकेटमध्ये पंत भारतीय संघासाठी वेगवान फलंदाजीसोबत विकेटकीपिंगची जबाबदारीही सांभाळतो. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पंतच्या जागी कोण जबाबदारी घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.केएस भरत आणि इशान किशन यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

अनेक क्रिकेट तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की भरतला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले जाईल. कारण तो दीर्घकाळ भारतीय कसोटी संघात आहे आणि त्याने फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीद्वारे कसोटी पदार्पणही केले आहे. त्याच वेळी, अनेक तज्ञ म्हणतात की जर तुम्हाला संघात एक्स फॅक्टर हवा असेल तर तुम्ही इशान किशनसोबत जावे.

हेही वाचा – WTC Final 2023: ऑस्ट्रेलिया पाठोपाठ भारतीय संघाच्याही वाढल्या अडचणी, सरावादरम्यान ‘या’ स्टार खेळाडूला झाली दुखापत

डब्ल्यूटीसी फायनलसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकीपर).

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Responding to wisdens tweet ahead of wtc final rishabh pant says he missing cricket vbm
First published on: 05-06-2023 at 10:34 IST