क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर भारत वि. इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. इंग्लंडने सलग तिसऱ्या सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघाला गोलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. या सामन्यात भारताकडून प्लेईंग इलेव्हनमध्ये जसप्रीत बुमराह परतला आहे. या सामन्याची सुरुवात खास पद्धतीने झाली. क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने लॉर्ड्सच्या घंटानादाने सामन्याची अधिकृत सुरुवात केली.
इंग्लंडने सलग तिसऱ्या सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघाला गोलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. या सामन्यात भारताकडून प्लेईंग इलेव्हनमध्ये जसप्रीत बुमराह परतला आहे. याचबरोबर या सामन्यात सचिन तेंडुलकरने लॉर्ड्स सामन्यात घंटानाद करत सामन्याला सुरूवात झाली.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला आता “अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी” असं नाव देण्यात आलं आहे. हे नाव सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्या सन्मानार्थ देण्यात आलं आहे. सचिन तिसऱ्या कसोटीच्या आधी मैदानात उपस्थित होता आणि त्याने खास पाहुणा म्हणून लॉर्ड्सच्या घंटानादाची परंपरा पार पाडली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
लॉर्ड्सच्या मैदानावर घंटानाद करणं हा मोठा सन्मान मानला जातो. लॉर्ड्स क्रिकेट मैदान हे क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जातं. सर्वाधिक १४५ कसोटी सामन्यांच्या आयोजनाचा मान लॉर्ड्सला मिळाला आहे. लॉर्ड्समध्ये पॅव्हेलियनच्या पॅव्हेलियनच्या लगतच ही घंटा ठेवण्यात आली आहे. गेल्या अनेक दशकांपासून ही परंपरा सुरू आहे आणि दरवर्षी जेव्हा या मैदानावर कसोटी सामना होतो तेव्हा एका खास पाहुण्याकडून घंटानाद केला जातो. सामना सुरू होण्याची औपचारिक सुरुवातीची घोषणा देखील मानली जाते.
भारत वि. इंग्लंड कसोटी मालिकेत दोन्ही संघ आतापर्यंत बरोबरीत आहेत. पहिला सामना इंग्लंडने तर दुसरा सामना भारतीय संघाने जिंकला. त्यामुळे ही कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. दरम्यान तिसरा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
इंग्लंड संघ
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट , हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ(यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर