Shubman Gill and Shreyas Iyer’s partnership broke Sachin Tendulkar and VVS Laxman’s record: इंदूर येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, भारतीय फलंदाजांनी कांगारू गोलंदाजांचा जोरदार समाचार घेतला. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ५० षटकात ५ गडी गमावून ३९९ धावा केल्या, जी एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची सर्वोच्च धावसंख्या होती. शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीसह केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांच्या झटपट अर्धशतकांनीही भारतीय संघाला ही धावसंख्या गाठण्यात मोठी भूमिका बजावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यात शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी टीम इंडियाला मजबूत आधार दिला. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १६५ चेंडूत २०० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. या भागीदारीच्या जोरावर या दोन्ही फलंदाजांनी इंदूरमध्ये सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी बनवलेला २२ वर्ष जुना विक्रम मोडला.

गिल आणि श्रेयसने सचिन आणि लक्ष्मणचा २२ वर्ष जुना विक्रम मोडला –

3

या सामन्यात शुबमन गिलने १०४ धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने १०५ धावांची शतकी खेळी केली. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी झाली आणि इंदूरमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी एक नवा विक्रम रचला गेला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताची ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. यापूर्वी हा विक्रम सचिन आणि लक्ष्मणच्या नावावर होता. या दोघांनी २००१ साली इंदूरमध्ये कांगारू संघाविरुद्ध १९९ धावांची भागीदारी केली होती. आता गिल आणि श्रेयसने २०० धावांची भागीदारी करून त्यांचा विक्रम मोडला.

हेही वाचा – VIDEO: के. एल. राहुलने कॅमेरून ग्रीनला दाखवले दिवसा तारे, असा खणखणीत षटकार मारला की चेंडू थेट स्टेडियम बाहेर गेला

घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात भारताची सर्वात मोठी भागीदारी –

२०० – शुबमन-श्रेयस, इंदूर (२०२३)
१९९ – सचिन/लक्ष्मण, इंदूर (२००१)
१९३ – रोहित-शिखर, मोहाली (२०१९)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी करणारी ही तिसरी यशस्वी जोडी आहे. शिखर धवन आणि विराट कोहली यांनी २०१६ मध्ये सर्वाधिक २१२ धावा केल्या होत्या, तर कोहलीने रोहित शर्मासह पर्थमध्ये दुसऱ्या विकेटसाठी २०७ धावा केल्या होत्या.

गिलने वनडेत पहिल्यांदा केली धावांची २०० भागीदारी –

शुबमन गिलने वनडेत प्रथमच २०० धावांची भागीदारी केली आणि श्रेयस अय्यरने त्याला चांगली साथ दिली. यापूर्वी २०२३ मध्ये श्रेयसने सातवेळा शतकी भागीदारी केली होती.

हेही वाचा – पावसानंतरही ‘सूर्या’ तळपला! कॅमरुन ग्रीनला ठोकले सलग ४ षटकार, ३६० डिग्री फलंदाजाचा Video पाहिलात का?

२०२३ मध्ये शुबमन गिलची शतकी भागीदारी –

१४३ धावा – रोहित/गिल विरुद्ध श्रीलंका
१३१ धावा – विराट/गिल विरुद्ध श्रीलंका
२१२ धावा – रोहित/गिल विरुद्ध न्यूझीलंड
१४३ धावा – इशान/गिल विरुद्ध वेस्ट इंडिज
१४७* धावा – रोहित/गिल विरुद्ध नेपाळ
१२१ धावा – रोहित/गिल विरुद्ध पाक
१४२ धावा – ऋतुराज/गिल विरुद्ध ऑस्ट्रेलिया
२०० धावा – श्रेयस/गिल विरुद्ध ऑस्ट्रेलिया

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubman gill and shreyas iyers partnership broke sachin tendulkar and vvs laxmans record vbm
First published on: 24-09-2023 at 20:54 IST