SRH Retention and Release List IPL 2026: प्रत्येक चेंडूवर चौकार-षटकार वसूल करण्याच्या उद्देशाने सनरायझर्स हैदराबाद संघाने मोट बांधली आहे. ही ताकद वाढवण्याचा सनरायझर्सचा प्रयत्न असणार आहे. २०२४ मध्ये त्यांनी धडाक्यात अंतिम फेरी गाठली होती. जेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली होती. यंदाच्या हंगामात त्यांची कामगिरी यथातथाच झाली आणि त्यांना बादफेरीसाठी पात्र होता आलं नाही.

वर्कलोड मॅनेजमेंटमुळे कर्णधार पॅट कमिन्स संपूर्ण हंगाम खेळू शकेल याविषयीही साशंकता आहे. अशा परिस्थितीत संघात अनुभवी खेळाडू असावा असा हैदराबादचा प्रयत्न आहे. हैदराबादने अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला ट्रेड केलं आहे. शमी आता लखनौ सुपरजायंट्सकडून खेळताना दिसेल.

धडाकेबाज फलंदाज हेनरिच क्लासनला हैदराबाद संघ सोडणार अशी चर्चा आहे.हैदराबाद लवकरच रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करेल.

सनरायझर्स हैदराबाद रिटेन केलेले खेळाडू
ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर.स्मरण, इशान किशन, हेनरिच क्लासन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कार्स, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकत, इशान मलिंगा, झीशान अन्सारी

रिलीज केलेले खेळाडू
अभिनव मनोहर, अथर्व तायडे, सचिन बेबी, विआन मुल्डर, मोहम्मद शमी (ट्रेडआऊट), सिमरजीत सिंग, राहुल चहर, अॅडम झंपा