Suryakumar Yadav Briliant Catch: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन टी२० मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने २० षटकात ४ विकेट्स गमावत २३४ धावा केल्या. शुबमन गिलने ६३ चेंडूत नाबाद १२६ धावा केल्या. डोंगराएवढ्या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था बिकट झाली असून १० धावाच्या आता ४ विकेट्स पडल्या आहेत. त्यात सूर्यकुमार यादवने पकडलेल्या दोन झेलचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने २० षटकात ४ विकेट्स गमावून २३४ धावा केल्या. न्यूझीलंडला विजयासाठी २३५ धावा करायच्या आहेत. टीम इंडियाकडून शुबमन गिलने सर्वाधिक नाबाद १२६ धावा केल्या. त्याने ६३ चेंडूंच्या खेळीत १२ चौकार आणि सात षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट २००.०० होता. गिलच्या कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांनंतर आता टी२० मध्येही शतके झाली आहेत. गिलसह दीपक हुडा नाबाद राहिला. दीपकने दोन चेंडूंत दोन धावा केल्या.

सुर्याचा अ‍ॅक्शन रिप्ले झेल

सुर्या हा फक्त दिवसा तळपतो पण भारतीय संघातील सुर्या म्हणजेच ‘मिस्टर ३६०’ हा रात्री देखील तळपतो हे त्याने त्याच्या दोन्ही अफलातून झेलने सिद्ध केले. हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांनी न्यूझीलंडला सुरुवातीलाचा धक्के दिले. कर्णधार हार्दिकने पहिल्याच षटकात फिन अॅलनला बाद केले. शॉट पिच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. चार चेंडूत तीन धावा करून अॅलन सूर्यकुमार यादवकडे झेलबाद झाला. पुढच्याच षटकात अर्शदीप सिंगने डेव्हॉन कॉनवेला हार्दिक पांड्याकरवी झेलबाद केले. कॉनवेने दोन चेंडूत एक धाव घेतली.

तशीच पुनरावृत्ती चौथ्या विकेट दरम्यान झाली. गोलंदाज तोच आणि झेल घेणारा देखील तोच मात्र फलंदाज यावेळी वेगळा होता. हार्दिक पांड्याचा शॉट पिच चेंडू टाकला आणि ग्लेन फिलिप्सला तो कळलाच नाही. फिलिप्स त्यावर थर्ड मॅनला शॉट मारण्याच्या नादात स्लीपमध्ये झेलबाद झाला. सूर्यकुमार यादवने उडी मारत अफलातून झेल घेतला. तो खराच SKY आहे हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले.

हेही वाचा: IND vs NZ 3rd T20I: अहमदाबादमध्ये शुबमन गिलचे वादळ! शतकांची मालिका सुरुच, न्यूझीलंडला फोडला घाम

तत्पूर्वी, मायकेल ब्रेसवेलने दुसऱ्याच षटकात भारताला धक्का दिला. इशान किशन पायचीत झाला. राहुल त्रिपाठी व शुबमन यांनी चांगली फटकेबाजी करून ४२ चेंडूंतील ८० धावांची भागीदारी केली. शुबमनला ३४ धावांवर जीवदान मिळाले. राहुल २२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४४ धावांवर माघारी परतला. सूर्यकुमार यादव मैदानावर येताच स्टेडियम दणाणून निघाले. सूर्यानेही त्याचा फॉर्म दाखवताना सुरेख फटके मारले. पण, २४ धावांवर ब्रेसवेलने त्याचा अप्रतिम झेल टिपला. सूर्या व गिलने २५ चेंडूंत ३८ धावा जोडल्या. शुबमन आज किवी गोलंदाजांना जुमानत नव्हता. १६व्या षटकात त्याने डिप स्क्वेअर लेगला दोन सलग षटकार खेचले. शुबमनने हार्दिक पांड्यासह २२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. गिलने ५४ चेंडूंत टी२०तील शतक पूर्ण केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suryakumar yadav took three fabulous catches and two of them was literally action replay even bowler was same avw
First published on: 01-02-2023 at 21:58 IST