ICC T20 World Cup 2024, USA vs IND Highlights: भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. भारताने बुधवारी अमेरिकेवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अमेरिकेने १११ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने १८.२ षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह भारताने सुपर८ फेरीत प्रवेश केला आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. विराट कोहली पहिल्याच षटकात गोल्डन डकचा बळी ठरला. तर तिसऱ्या षटकात रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. अमेरिकेचा महत्त्वाचा गोलंदाज सौरभ नेत्रावळकरने या दोघांच्या विकेट्स आपल्या नावे केल्या.

Live Updates

T20 World Cup 2024, United States of America vs India Highlights: न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी स्टेडियमवर भारत वि अमेरिका यांच्यात टी-20 विश्वचषकातील सामना खेळवला गेला. ज्यात भारतीय गोलंदाज आणि सूर्यकुमार यादवच्या फटकेबाजीसह भारताने विजय मिळवला.

16:53 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: दोन्ही संघांची सुपर८ वर नजर

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडे अमेरिकेला पराभूत करत सुपर८ फेरीत प्रवेश करण्याची चांगली संधी आहे. मात्र, अमेरिकेला साधारण संघ समजण्याची चूक रोहित ब्रिगेड करणार नाही. भारताप्रमाणेच अमेरिकेनेही साखळी फेरीतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला असून त्यांचा विजय रथ ही सुसाट आहे. क्रिकेटमधील मोठा अपसेट घडवत अमेरिकेने पाकिस्तानच्या संघाला धोबीपछाड देत मोठा विजय मिळवला. तर भारताने आयर्लंड आणि पाकिस्तानला पराभूत केले तर अमेरिकेने कॅनडा आणि पाकिस्तानविरुद्ध मोठे अपसेट खेचले. त्यामुळे भारताप्रमाणेच अमेरिकेलाही भारताला पराभूत करत सुपर८ गाठण्याची मोठी संधी आहे, पण ही गोष्ट नक्कीच अवघड आहे.

16:47 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: आज अमेरिका आणि भारतात लढत

क्रिकेटच्या विश्वात महासत्ता असलेला भारतीय संघ आणि जागतिक पातळीवर महासत्ता असलेला अमेरिकेचा संघ आज क्रिकेटच्या रणांगणात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर भारत आणि अमेरिकेमधील ही लढत लक्षवेधक असणार आहे. उभय संघ प्रथमच क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने येणार आहेत. भारत हा एक उत्कृष्ट संघ असून अमेरिकेचा संघ सध्या नावारूपाला येऊ पाहत आहे. त्यामुळे आजच्या लढतीवर सर्वांची नजर असणार आहे.

16:40 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: टी-२० विश्वचषकासाठी अमेरिकेचा संघ:

मोनांक पटेल (कर्णधार आणि यष्टिरक्षक),अॅरोन जोन्स (उपकर्णधार), अँड्रिज गॉस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोशतुश केंजिगे, सौरभ नेत्रावळकर, शेडली व्हॅन शाल्कविक, स्टीव्हन टेलर आणि शायन जहांगीर.


16:39 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: टी-२० विश्वचषकासाठी भारताचा संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र यादव चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

ICC T20 World Cup 2024 USA vs IND Highlights : टी-२० विश्वचषकातील भारत वि अमेरिका सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने अमेरिकेवर ७ विकेट्सने विजय मिळवत सुपर ८ मध्ये धडक मारली आहे.