भारतीय वंशाच्या खेळाडूंनी सजलेला अमेरिकाचा संघ सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेत उतरणार आहे.२०२४ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात अमेरिका संघाने पाकिस्तानचा पराभव करत खळबळ उडवून दिली होती. स्पर्धेतील सर्व ९ सीझनमध्ये खेळलेल्या पाकिस्तानचा पराभव करत अमेरिकेने स्वत:ला जायंटकिलर सिद्ध केलं होतं.अमेरिकेच्या संघाचा कर्णधार मोनांक पटेल हा भारतीय वंशाचा आहे, त्याच्या नेतृत्त्वाखाली संघ स्पर्धेत उतरेल. शुभम रांजणे व सौरभ नेत्रावळकर हे मराठमोळे खेळाडू आहेत.सौरभ नेत्रावळकरने विराट कोहलीला २०२४ च्या टी-२० विश्वचषकात बाद केलं होतं.