World Cup 2023, India vs Australia Match Upadates: आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये भारत पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने डावाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला . भारताचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहने मिचेल मार्शला बाद केले. ६ चेंडू खेळून मार्शला खातेही उघडता आले नाही. विराट कोहलीने मिचेल मार्शचा अप्रतिम झेल घेतला. हा झेल घेत विराट कोहलीने अनिल कुंबळेचा विक्रम मोडला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराटने मोडला अनिल कुंबळेचा विक्रम –

भारताचा महान फलंदाज विराट कोहली आपल्या शानदार क्षेत्ररक्षणाने अनेकदा आश्चर्यचकित करतो. कोहलीने अनेकदा आपल्या शानदार क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. याची पुनरावृत्ती विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात केली. या सामन्यात विराटने मिचेल मार्शचा जबरदस्त झेल घेतला. त्याचबरोबर विराट कोहली एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू बनला आहे. त्याने अनिल कुंबळचा विक्रम मोडला.

एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक झेल (यष्टीरक्षक नसलेले)

१५ – विराट कोहली*
१४- अनिल कुंबळे
१२ – कपिल देव
१२ – सचिन तेंडुलकर

हेही वाचा – World Cup 2023: “मला माहित नाही की हा संघ…”; विश्वचषकापूर्वी हरभजन सिंगने टीम इंडियाच्या एकजुटीवर उपस्थित केला प्रश्न

तिसर्‍या षटकात बुमराहला चेंडू देण्यात आला होता. ओव्हरच्या दुसऱ्याच चेंडूवर बुमराहने मार्शला झेलबाद केले. मिचेल मार्शला हा चेंडू कीपरच्या बाजून सीमारेषेकडे पाठवायचा होता. पण स्लीपमध्ये असलेल्या विराट कोहलीने चपळाईने झेल पकडला. त्यामुळे मार्शला खाते न उघडता तंबूत परतावे लागेल. या विकेटसह ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का अवघ्या ५ धावांवर बसला. या झेलसह विराट कोहलीनेही एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कोहली भारतासाठी क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू ठरला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरुन ग्रीन, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, अ‍ॅडम झाम्पा.

हेही वाचा – Afghanistan Earthquake: कौतुकास्पद! राशिद खानचा मोठा निर्णय, विश्वचषकातील सर्व मॅच फी भूकंपग्रस्तांना दान

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli breaks anil kumbles world cup record by taking mitchell marshs catch ind vs aus match vbm