India vs Australia, Virender Sehwag: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा सामना २७ सप्टेंबर रोजी राजकोट येथे होणार आहे. टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यातही विजय मिळवत कांगारूंना व्हाईटवॉश देण्याचा भारतीय संघाचा इरादा आहे. तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्यासमोर प्लेईंग-११ निवडण्याची खूप मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंदोरमध्ये शतक झळकावणारा शुबमन गिल
टीम इंडियाने सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाला ४०० धावांचे आव्हान दिले होते. ही धावसंख्या उभारताना यावेळी श्रेयस अय्यर
भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ९९ धावांनी पराभव केला. या सामन्यात सलामीवीर शुबमन गिलने ९७ चेंडूत १०४ धावा केल्या. ज्यात त्याने ६ चौकार आणि ४ षटकारही मारले. गिलच्या या खेळीवर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग नाराज झाला आहे. क्रिकबझशी बोलताना सेहवाग म्हणाला, “गेल्या वेळी तो चुकला होता, पण आज त्याने शतक झळकावत याची खात्री तो फॉर्ममध्ये आहे. मी अजूनही म्हणेन की तो ज्या फॉर्ममध्ये त्याने १६०, १८० किंवा २०० धावा केल्या पाहिजेत. खराब फटका मारून बाद होणे मला नाही आवडले.”
टीम इंडियाच्या या कामगिरीवर वीरेंद्र सेहवाग खूप खुश झाला. त्याने ट्वीट करत लिहिले की, “डोकं एक, डोकेदुखी अनेक. विश्वचषकापूर्वी भारताला प्लेईंग-११ निवडण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागणार आहे. योग्यवेळी योग्य खेळाडूची निवड केली तर भारतीय संघाला हरवणे कठीण होईल. विजयानंतर सर्वजण पार्टीत सहभागी होतायेत, त्यामुळे ड्रेसिंगरूममध्ये असणारे वातारण खूप चांगले आहे.” त्याचे हे ट्वीट वन डे विश्वचषक २०२३ संदर्भात केले आहे.
सेहवाग पुढे म्हणाला, “तो फक्त २५ वर्षांचा आहे, जरी आज त्याने २०० धावा केल्या असत्या तरी तो थकला नसता आणि क्षेत्ररक्षणही करू शकला असता. वयाच्या ३०व्या वर्षी, हे कठीण दिसते कारण आपण त्यातून बरे होऊ शकत नाही. म्हणूनच आता मोठ्या धावा करणे त्याच्यासाठी चांगले आहे.” ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुबमन गिलचे शतक हुकले. या सामन्यात त्याने ७४ धावा केल्या होत्या. इंदोर येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याचे शतक पूर्ण करण्यात त्याला यश आले. या डावात तो चांगला खेळत होता, पण कॅमेरून ग्रीनच्या चेंडूवर खराब शॉट खेळून तो बाद झाला.
वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “जेव्हा तुम्ही फॉर्ममध्ये असाल आणि धावा करत असाल तेव्हा तुम्ही तुमची विकेट फेकू नका. तो (शुबमन) बाद झाला तेव्हा १८ षटके बाकी होती. त्याने आणखी ९-१० षटके खेळली असती तर त्याला आपले द्विशतक पूर्ण करता आले असते. रोहित शर्माने तीन द्विशतके झळकावली, आज त्याला संधी होती. या मैदानावर एका खेळाडूने २०० धावा केल्या आहेत, ज्याचे नाव सेहवाग आहे, कारण तो अशाच ट्रॅकवर होता.”
मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwag is not happy with shubman gills century said he should not do this also big statement on team selection avw