Wasim Jaffer’s squad for ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा यंदा भारतात होणार आहे. क्रिकेटच्या या महाकुंभाचे वेळापत्रकही आयसीसीने जाहीर केले आहे. भारतातील १० शहरांमध्ये एकूण ४८ विश्वचषक सामने खेळवले जाणार आहेत. आतापर्यंत भारतीय क्रिकेट बोर्डाने विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड केलेली नाही. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने आपला पंधरा १५ सदस्यीय संघ निवडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिओ सिनेमावरील चर्चेदरम्यान, वसीम जाफरने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपला आवडता १५ सदस्यीय संघ निवडला. यामध्ये त्याने तीन सलामीवीरांना स्थान दिले. यात रोहित शर्मा, शिखर धवन आणि शुबमन गिल यांना निवडले आहे. तो म्हणाला, “माझ्याकडे तीन सलामीवीर असतील. शिखर धवनची निवड होणार नसली तरी, मी त्याला माझ्या संघात बॅकअप सलामीवीर म्हणून ठेवेन.”

मधल्या फळी आणि फिरकीपटूबद्दल तो पुढे म्हणाला, “विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळेल यात शंका नाही. श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर, केएल राहुल पाचव्या क्रमांकावर आणि हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर खेळेल. यानंतर माझे तीन फिरकीपटू रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव असतील.”

हेही वाचा – Shikhar Dhawan : ‘ना रेडी’ गाण्यावर शिखर धवनने धरला ठेका, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

माजी भारतीय सलामीवीर म्हणाला, “माझ्या विश्वचषक इलेव्हनमध्ये जसप्रीत बुमराह असेल. त्याचबरोबर शमी आणि सिराजमधील एक असेल. मी सिराज आणि बुमराह या दोन वेगवान गोलंदाजांची निवड करेन. माझ्यासाठी हार्दिक पांड्याने गोलंदाजी करणे महत्त्वाचे आहे. कारण विश्वचषक भारतात आहे आणि माझ्या इलेव्हनमध्ये तीन फिरकीपटू असतील.”

एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या स्पर्धेसाठी वसीम जाफरचा भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन (राखीव यष्टिरक्षक) आणि शार्दुल ठाकूर.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wasim jaffer named the 15man squad for team india for odi world cup 2023 vbm