Video: सूर्यकुमार यादवची ‘स्वत:ची पुष्पा’ पाहिलीत का?; शेअर केला ‘श्रीवल्ली’वरील मजेदार डान्स

नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा – द राइज’ चित्रपटाची सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा असतानाच हा व्हिडीओ समोर आलाय.

Suryakumar Yadav shakes a leg with Ishan Kishan
सूर्यकुमार यादवचा हा व्हिडीओ चर्चेत

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनसुद्धा भारतीय संघासोबत आहेत. १९ जानेवारीपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघामध्ये समावेश असणारे मुंबई इंडियन्सचे हे दोन्ही खेळाडू मालिका सुरु होण्यापूर्वी मज्जा मस्ती करताना दिसत आहेत. नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा – द राइज’ चित्रपटाची सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा आहे. अनेक खेळाडूंनी या चित्रपटांचे संवाद आणि गाणी सोशल मीडियावर पोस्ट केल्याचं पहायला मिळाय. यामध्ये रविंद्र जडेजा, शिखर धवन डेव्हिड वॉर्नरसारख्या खेळाडूंचा समावेश असून यात आणखीन एका नावाचा समावेश झालाय.

सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही अल्लू अर्जूनच्या स्टाइलमध्ये पुष्पा चित्रटातील श्रीवल्ली गाण्यावर नाचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ एका हॉटेलच्या लॉबीमध्ये शूट करण्यात आल्याचं दिसत आहे. व्हिडीओत आधी सूर्यकुमार यादव श्रीवल्ली गाण्यामधील पाय घसरुन चालण्याची स्टेप करताना दिसत आहे.

डान्स करताना चित्रपटामध्ये दाखवण्यात आलंय त्याप्रमाणे मध्येच सूर्यकुमारची चप्पल पायातून निघते आणि तो ती गिरकी घेऊन पुन्हा घालतो. तितक्यात डाव्याबाजूने ईशान किशन येतो आणि सूर्यकुमारला जॉइन होतो. मग दोघेही अल्लू अर्जूनने केलेली पाय घासत चालण्याची स्टेप करताना व्हिडीओत दिसत आहेत. व्हिडीओच्या शेवटी ईशान किशनला हसू अनावर होतं आणि तो खाली बसून हसतानाही दिसत आहे. या व्हिडीओला सूर्यकुमारने, “माझ्या स्वत:च्या पुष्पासोबत,” अशी कॅप्शन दिलीय.

यापूर्वी रवींद्र जडेजाने चित्रपटातील संवाद आणि शिखर धवननेही चित्रपाटातील गाण्याचा व्हिडीओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांना स्वत:मधील कलाकारचं दर्शन घडवलं होतं. जडेजा सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर असला तरी शिखर धवन वनडे सिरीजसाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झालाय.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: With my very own pushpa suryakumar yadav shakes a leg with ishan kishan scsg

Next Story
जोकोव्हिच अखेर माघारी; व्हिसा रद्द न करण्याची विनंती ऑस्ट्रेलियाच्या न्यायालयाने फेटाळली
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी