Yuvraj Singh’s Reaction on Contesting Gurdaspur Lok Sabha Elections : माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आगामी लोकसभा निवडणुकीत गुरुदासपूर मतदारसंघातून भाजपचा उमेदवार असेल? सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या युवराज सिंगने राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे का? युवराज सिंग लोकसभा निवडणूक लढवणार का? गेल्या काही दिवसांपासून युवीबाबत अशा अनेक बातम्या येत होत्या. आता यावर युवराज सिंगने लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या युवराज सिंगने शुक्रवारी राजकारणात प्रवेश करून पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे सर्व वृत्त फेटाळून लावले. गरजू लोकांना अनेक प्रकारे आधार देणे आणि त्यांना मदत करणे हा त्यांचा ध्यास आहे, जो त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या त्याची राजकारणात येण्याची इच्छा नाही.

४२ वर्षीय युवराज सिंगने शुक्रवारी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केले की, मीडिया रिपोर्ट्सच्या उलट, मी गुरुदासपूरमधून निवडणूक लढवत नाही. गरजू लोकांना विविध माध्यमे आणि क्षमतांद्वारे आधार देणे आणि मदत करणे ही माझी आवड आहे. तसेच मी माझ्या ‘YouWeCan’ या संस्थेद्वारे हे करत राहीन. YouWeCan फाउंडेशन कर्करोगाच्या रुग्णांना मदत करते. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर, जेव्हा युवराज सिंग अमेरिकेत गेला आणि त्याच्या कर्करोगाचा उपचार केला. यानंतर त्यानी आपले फाउंडेशन सुरू केले, जे कॅन्सरग्रस्त लोकांना मदत करते.

हेही वाचा – Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत

युवराज सिंग भाजपच्या तिकीटावर गुरुदासपूरमधून निवडणूक लढवू शकतात, असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. विद्यमान खासदार सनी देओल पुन्हा ती जागा लढवण्याची शक्यता फारच कमी आहे. युवराज सिंग आणि त्याची आई शबनम सिंग यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या भेटीनंतर गुरुदासपूरमधून क्रिकेटपटू निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आली होती.

हेही वाचा – IND vs ENG 4th Test : यशस्वी जैस्वाल एक धाव काढताच रचणार इतिहास, गावसकर-गूचचा विक्रमही धोक्यात!

युवराजने भारताला दोन विश्वचषक जिंकून दिले –

युवराज सिंग २००७ टी-२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा एक सदस्य होता. २०११ च्या विश्वचषकासाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कारही देण्यात आला होता. युवीने २००० मध्ये नैरोबी येथे केनियाविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. त्याने भारतासाठी शेवटचा सामना ३० जून २०१७ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. यानंतर २०१९ मध्ये युवीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuvraj singh refuted media reports saying that he is not contesting the gurdaspur lok sabha elections vbm