केस चमकदार, सुंदर आणि केसांची चांगली वाढ होण्यासाठी तेल लावणे आवश्यक आहे. केसांना तेल लावल्याने केस मजबूत आणि निरोगी होतात. केसांमधील फ्रिजिनेस कमी होतो आणि केस तुटण्याचा धोका देखील उद्भवत नाही. केसांना नेहमी हायड्रेट ठेवण्यासाठी तेल लावणे आवश्यक आहे. तेल लावल्याने केसांना पोषण मिळते आणि केस घन आणि चमकदार होतात. तेल लावल्याने केसांसोबतच टाळूलाही फायदा होतो.

जेव्हा तुम्ही तुमच्या टाळूला हळूवारपणे मसाज करता तेव्हा ते एक्सफोलिएशनमध्ये मदत करते, ज्यामुळे कधीकधी केस गळणे देखील थांबू शकते. केसांना तेल लावणे हे केसांसाठी खूप महत्त्वाचे आहे, परंतु हे महत्त्वाचे काम करताना आपण काही चुका करतो, ज्यामुळे केसांना फायदा होण्याऐवजी नुकसान होते. केसांना तेल लावल्यानंतर काही चुका केल्याने केस गळणे आणि कोंडा होण्याची समस्या वाढू शकते, त्यामुळे आजच या चुका सुधारा.

( हे ही वाचा: Diabetes Symptoms: मधुमेहाची पातळी २०० mg/dL पेक्षा जास्त झाल्यास हातामध्ये दिसू लागतात ‘ही’ ३ गंभीर लक्षणे; जाणून घ्या कसे ओळखावे)

केसांना तेल लावल्यानंतर केस विंचरल्यास केसगळती वाढू शकते

केसांना तेल लावल्यानंतर केसांचा गुंता होतो आणि त्यानंतर केस विंचरल्यानंतर केस गळण्याची समस्या वाढू लागते. तेल लावल्यानंतर केसांना विंचरणे ही सर्वात मोठी चूक आहे. तेल लावल्यानंतर टाळूला आराम मिळतो आणि अशावेळी कंघी केल्याने केस अधिक तुटतात.

तेल लावल्यानंतर केस घट्ट बांधू नका

केसांना तेल लावल्यानंतर केसांना घट्ट बांधल्यामुळे डोके दुखू लागते आणि केस अधिक तुटतात. केसगळती टाळण्यासाठी तेल लावल्यानंतर केस बांधू नका.

( हे ही वाचा: करोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘Brain Fog’चा धोका; जाणून घ्या याची लक्षणे आणि बचावासाठी उपाय)

मसाज करताना केस चोळल्याने नुकसान होऊ शकते

काही लोक केसांना तेल लावताना केस घट्ट चोळतात, त्यामुळे केस तुटण्याचा धोका जास्त असतो. जर तुम्हीही तेल लावताना केसांना घासत असाल तर तुमची ही सवय बदला. केस घासल्याने केस लवकर कमकुवत होतात आणि तुटतात.

रात्रभर तेल लावून ठेवू नका

काही लोकांना असे वाटते की रात्रभर तेल वापरल्याने केस निरोगी राहतील आणि केसांना अधिक पोषण मिळेल. असे केल्याने केस अधिक तुटतात. शॅम्पूच्या १ ते २ तास आधी केसांना तेल लावा.

( हे ही वाचा: Uric Acid: युरिक ऍसिड फक्त एका महिन्यात कमी होईल; ‘या’ ३ प्रकारच्या पानांचे सेवन करा, मिळेल आश्चर्यकारक फायदा)

डोक्यात कोंडा असल्यास टाळूला तेल लावू नका

जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल तर केसांना तेल लावू नका, परंतु स्कॅल्प स्वच्छ करण्यासाठी कोरफड जेल, कडुलिंबाची पाने किंवा कडुलिंबाचे तेल वापरा, तुमचे केस अधिक चांगले होतील.