मधुमेह हा सामान्य आजार बनत चालला आहे. जगभरातील ४६३ दशलक्ष लोकं या आजाराने ग्रस्त आहेत. देशात आणि जगात मधुमेह वाढण्यामागे बिघडलेली जीवनशैली, खराब आहार हे मुख्य कारण आहे. मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये स्वादुपिंड इन्सुलिन तयार करणे थांबवते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. यामुळे वाढत्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुप्रसिद्ध योग तज्ज्ञ आणि द योगा इन्स्टिट्यूटच्या संचालक हंसा जी योगेंद्र यांच्या मते, या आजारापासून वेळीच बचाव करणे अत्यंत आवश्यक आहे. या आजाराची वेळीच लक्षणे ओळखून यावर उपचार केला तर यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर वेळीच तोडगा काढता येऊ शकतो. मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात अशा पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे ज्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे आणि जे रक्तातील साखर सहज नियंत्रित करू शकतात.

जर मधुमेही रुग्णांची साखरेची पातळी २५०MG/DL पेक्षा जास्त असेल, तर त्यांनी आवळ्याचा रस प्यावा. आवळा ज्यूस हे असे जादुई पेय आहे ज्याचा वापर रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी सहज करता येते. चला जाणून घेऊया तज्ज्ञांकडून आवळ्याचा रस रक्तातील साखर कशी नियंत्रित करतो.

आवळ्याचा रस रक्तातील साखरेचे नियंत्रण कसे करतो?

पोषक तत्वांनी समृद्ध, आवळ्यामध्ये क्रोमियमसारखे घटक असतात जे कर्बोदकांमधे मेटाबॉलिज्म मजबूत करतात. आवळ्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात. ऑक्सिडेटिव्ह ताण कमी झाल्यास रक्तातील साखरेचे नियंत्रण राहते. आवळा खाल्ल्याने स्वादुपिंड वेगाने इन्सुलिन तयार करते आणि रक्तातील साखर नियंत्रित करते. आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो.

( हे ही वाचा: भारतात ‘या’ मंदिरात केली जाते मांजरीची पूजा; ठिकाणाचे नाव जाणून तुम्हीही थक्क व्हाल)

व्हिटॅमिन सी समृद्ध आवळ्याचा रस रक्तातील साखर नियंत्रित करतो

आर्काइव्स ऑफ इंटर्नल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, व्हिटॅमिन सीचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. आवळ्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे मधुमेह नियंत्रित करते. रोज एक ग्लास आवळ्याचा रस मधुमेहाच्या रुग्णांवर औषधाप्रमाणे काम करतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gooseberry juice benefits for blood sugar control know its other benefits gps