Health Tips: जिम सुरु करण्याआधी ‘या’ गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या; अन्यथा फायद्याच्या जागी होऊ शकते नुकसान

जिममध्ये जाण्यापूर्वी प्रत्येकाने काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत.

things to know before starting a gym
व्यायामशाळेत कोणत्या प्रकारची खबरदारी घेतली पाहिजे याबद्दल जाणून घेऊया. (Photo : Pexels)

आकर्षक शरीर असणं हे प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं. चांगली बॉडी बनवण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जिममध्ये जाऊन तासनतास घाम गाळतात. ही क्रेझ झपाट्याने वाढत आहे. वेगवेगळ्या वयोगटातील लोक जिममध्ये सामील होत आहेत आणि स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जिममध्ये जाण्यापूर्वी प्रत्येकाने काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. जर तुम्ही चुकीचा व्यायाम करत असाल तर ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. व्यायामशाळेत कोणत्या प्रकारची खबरदारी घेतली पाहिजे याबद्दल जाणून घेऊया.

जीएफएफआय फिटनेस अकादमी (दिल्ली) चे प्रशिक्षक पंकज मेहता म्हणतात की ८ वर्षापासून ते कोणत्याही वयोगटातील लोक जिममध्ये सामील होऊ शकतात. मात्र, या सर्वांनी ‘क्वालिफाईड इन्स्ट्रक्टर’च्या सूचनेनुसार व्यायाम करावा. जे लोक मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात किंवा इतर वैद्यकीय परिस्थितींनी ग्रस्त आहेत त्यांनी जिममध्ये जाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय अशा लोकांनी ‘स्पेशल पॉप्युलेशन ग्रुप’च्या ट्रेनरच्या हाताखालीच जिम करावी.

तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण

जिम करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • प्रत्येकाने आरामदायी कपडे घालून जिममध्ये यावे.
  • स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी, तुम्ही तुमच्यासोबत पाण्याची बाटली आणि एनर्जी ड्रिंक आणले पाहिजे.
  • जिममध्ये येण्यापूर्वी जड अन्न खाऊ नये, त्यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. एनर्जी ड्रिंक किंवा कोणतेही फळ जिमच्या आधी खाऊ शकता.
  • प्रत्येकाने प्रशिक्षकाच्या बायोकेमिकल टेक्निकनुसार व्यायाम केला पाहिजे. तसे न केल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.
  • घरी व्यायाम करणाऱ्यांनी चालणे आणि धावणे यापासून सुरुवात करावी.
  • फिटनेस ट्रेनर्सच्या मते, चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्याने शरीरातील संयोजी ऊतक तुटतात. स्नायू ताणले जाऊ शकतात आणि कधीकधी दुखापत होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी तुम्ही नेहमी जिम ट्रेनरच्या सूचनेनुसार व्यायाम केला पाहिजे.
  • जिममध्ये असताना प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. जर तुम्ही सकस आहार घेतला तर व्यायामाचा संपूर्ण परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येईल. ते म्हणतात की प्रोटीन पावडरऐवजी, तुम्ही नैसर्गिक पद्धतीने प्रथिने मिळवण्याचा प्रयत्न करा. तरीही तुम्हाला प्रोटीन पावडरची गरज भासत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Health tips pay close attention to these things before starting a gym otherwise the loss may be in place of the gain pvp

Next Story
आरोग्यवार्ता : हिवतापाच्या मृत्युसंख्येत ७९ टक्के घट
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी