Breakfast That Spikes Blood Sugar : सकाळी नाश्त्याला आपल्यापैकी बरेच जण पोट भरून खाणं पसंत करतात, तर याउलट काही जण काहीच न खाणं पसंत करतात. आपल्यातील अनेक जण सकाळी ब्रेड-आम्लेट, पोहे असे पदार्थ किंवा डब्यासाठी पोळी बनवली असेल तर ती चहाबरोबर खाणं पसंत करतात. त्यामुळे आज आपण बटाट्याचे पराठे, पोहे, ब्रेड-आम्लेट यांसारख्या आवडत्या पदार्थांचा रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा परिणाम होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया (Breakfast That Spikes Blood Sugar) …

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंटेंट क्रिएटर गगन सैनी यांनी अलीकडेच एक इन्स्टाग्राम रील शेअर केली होती. त्यांनी दोन बटाट्याचे पराठे व एक वाटी पोहे खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेत वाढ झाली, तर ब्रेड आम्लेट खाल्ल्यावर रक्तातील साखर स्थिर राहिली, ज्यामुळे या तिन्ही पदार्थांमध्ये स्थिर ऊर्जा पातळीसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे; असे सांगितले. तसेच त्यांनी रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी सतत ग्लुकोज मॉनिटरसुद्धा वापरला.

यावरून आपण काय अंदाज लावू शकतो (Breakfast That Spikes Blood Sugar)?

तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट गरिमा गोयल यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, रेसिपी तयार करण्याची पद्धत आणि जेवणाचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) यावर अवलंबून अन्नाचे रक्तातील साखरेच्या पातळीवर होणारा परिणाम खूप बदलू शकतो.

हेही वाचा…Eating Peanuts Every Day: दररोज मूठभर शेंगदाणे खाणं योग्य ठरेल का? आहारतज्ज्ञांनी सांगितलेले हे चार फायदे-तोटे जाणून घ्या

चला, प्रत्येक पदार्थाबद्दल एकेक करून जाणून घेऊया (Breakfast That Spikes Blood Sugar)…

बटाट्याचा पराठा :

बटाट्याचे पराठे बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, मसाले, स्मॅश केलेले बटाटे, तूप/तेल यांचा समावेश होतो. बटाट्याच्या पराठ्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) मध्यम ते उच्च असतो, म्हणजेच ५६ ते ७० असतो; जो वापरलेल्या पिठानुसार बदलतो. गव्हाच्या पिठातून येणारे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, बटाट्यातील साध्या कार्बोहायड्रेट्सच्या मिश्रणाने रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत माफक प्रमाणात वाढ होते. बटाटे उच्च जीआय अन्नाच्या रेंजमध्ये येतात, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत अचानक वाढ होते. मैदा किंवा जास्त प्रमाणात तूप/तेल वापरल्यास स्पाइक आणखी वाढते. म्हणजेच तुम्ही एकापेक्षा जास्त पराठे खाल्ल्यास रक्तातील साखरेची वाढ होऊ शकते; असे गरिमा गोयल यांनी सांगितले आहे.

पोहे

पोहे, शेंगदाणे,मोहरी आणि मसाल्यांचा वापर करून बनवलेला हा पदार्थ प्रचंड प्रसिद्ध आहे. पोह्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम ते उच्च ५६ ते ७० असतो. अगदी बटाट्याच्या परांठ्यांप्रमाणेच… पण, पोह्यात तांदळाच्या तुलनेत कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. पोह्यात काही फायबर-रिच भाज्या, शेंगदाणे घातल्याने कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी होण्यास मदत होते. मात्र, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) पोर्शनच्या आकारानुसार आणि पोहे बनवण्यात वापरलेल्या तेलाच्या प्रमाणानुसार पोह्यांचा GI मध्यम ते जास्त असू शकतो, असे गरिमा गोयल यांनी सांगितले आहे.

अंड्याचे आम्लेट आणि दोन ब्रेडचे स्लाईस

या नाश्त्यासाठी ब्रेड, अंडी, तेल वापरण्यात येते. तुम्ही दुकानातून विकत आणलेला ब्रेड संपूर्ण गव्हाचा किंवा ब्राऊन ब्रेड असावा. कारण या ब्रेडचा जीआय (GI) पांढऱ्या ब्रेडपेक्षा लक्षणीयरीत्या कमी असतो आणि त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. अंड्यांमधील प्रथिने आणि फॅट कंटेंटमुळे ही वाढ आणखी कमी होते. संपूर्ण गव्हाचा ब्रेड आणि अंडी यांचे मिश्रण अन्नातून ग्लुकोज सोडण्याचे प्रमाण कमी करते; असे पुढे गोयल यांनी नमूद केले आहे.

तुम्ही काय लक्षात ठेवलं पाहिजे (Breakfast That Spikes Blood Sugar)?

१. जर अंड्याचे आम्लेट तुम्ही गव्हाच्या ब्रेडबरोबर खाल्ले तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, त्यामुळे नाश्त्यासाठी इतर पदार्थ निवडण्यापूर्वी एकदा हा फायदा पहावा असे गरिमा गोयल यांनी सांगितले आहे.

२. बटाट्याचे पराठे बनवण्यासाठी तेल/तूप कमी वापरा. कार्बोहायड्रेट्सच्या पचनाचा वेग कमी करण्यासाठी दह्यासारखे प्रथिने पराठ्यांबरोबर खाण्याचा विचार करा.

३. पोह्यांमधे तुम्ही जास्त भाज्या घातल्या तर उच्च फायबर कंटेटमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होईल, त्यामुळे त्यात तेलही कमी वापरा, असे गरिमा गोयल यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aloo paratha poha and bread omelette fare when it comes to blood sugar spikes depending upon the ingredients of the recipe asp