आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीचा सगळ्यात जास्त परिणाम आरोग्यावर होत आहे. यात जेवणाच्या चुकीच्या सवयींचाही समावेश होतो. दिवसभर कामाच्या गडबडीत अनेकांना जेवायलाही वेळ मिळत नाही. त्यामुळे रात्रीच्या जेवणावर जास्त भर दिला जातो. पण रात्रीच्या वेळी म्हणजे झोपण्यापुर्वी काही पदार्थ खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कोणते आहेत असे पदार्थ जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रात्री झोपण्यापुर्वी कोणते पदार्थ खाणे टाळावे जाणून घ्या

आणखी वाचा- Yearender 2022: यावर्षी ‘हे’ घरगुती उपाय झाले सर्वाधिक सर्च; यातला तुम्ही कोणता उपाय केला होता सर्च?

  • रात्रीच्या वेळी जंक फूड खाणे टाळावे. झोपण्यापुर्वी जंक फूड खाल्ल्याने वजन वाढण्यासह हार्टबर्नची समस्याही उद्भवू शकते.
  • रात्री झोपण्यापुर्वी प्रोसेस्ड फूड खाणे टाळावे. हे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. झोपण्यापुर्वी प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने शरीरातील मोनोसोडियम ग्लूटामैटची पातळी वाढते. ज्यामुळे झोप न येण्याची समस्या होऊ शकते.
  • रात्री कच्च्या भाज्या खाणे टाळावे. कारण ताज्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे झोपेत पचनक्रियेशी निगडित समस्या निर्माण होऊ शकतात.तसेच यामुळे झोप बिघडू शकते.
  • चॉकलेटमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे झोपमोड होऊन, निद्रानाश होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे झोपण्यापूर्वी चॉकलेट खाणे टाळावे.
  • झोपण्यापुर्वी अल्कोहोलचे सेवन केल्यास त्याचाही झोपेवर परिणाम होऊ शकतो.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avoid these food items before sleeping at night know its side effects pns