२०२२ वर्ष आता काही दिवसात संपणार, वर्षाअखेर आपण वर्षभरात घडलेल्या घटनांना, आठवणींना उजाळा देतो. प्रत्येक वर्ष स्वतःबरोबर नवी आव्हानं घेऊन येते. त्यामुळे वर्षाच्या शेवटी ती सर्व आव्हानं पार करत आपण काय शिकलो याची आठवण करत आणखी जोशाने नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. आठवणींना जसा आपण उजाळा देतो, त्याप्रमाणे सर्च इंजिनद्वारे ही वर्षभरात सर्वाधिक सर्च करण्यात गोष्टींचा आढावा घेण्यात येतो. यामध्ये कोणत्या गोष्टी सर्वाधिक सर्च करण्यात आल्या हे जाणून घेण्यात प्रत्येकाला उत्सुकता असते. यावर्षी म्हणजेच २०२२ मध्ये कोणते घरगुती उपाय सर्वाधिक सर्च करण्यात आले जाणून घ्या.

२०२२ मध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलेले घरगुती उपाय

Do you know Swordbilled hummingbird The title bird with the longest beak in the world read about this everything
जगातील सर्वात लांब चोच असणारा पक्षी कोणता माहितीय का? जाणून घ्या….
hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय
Next gen Maruti Suzuki Dzire
मारुतीचा नाद करायचा नाय! देशात आणतेय ‘ही’ नवी हायब्रिड कार, कधी होणार भारतात दाखल?
Captains Salary List in IPL 2024
IPL 2024 : धोनी-पंड्या नव्हे, ‘हा’ कर्णधार घेतोय सर्वाधिक पैसे, आयपीएलच्या बक्षिसापेक्षा जास्त आहे मानधन

आणखी वाचा: फळं खाताना ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका; त्यामधील पोषकतत्त्व वाया घालवणाऱ्या चुका लगेच जाणून घ्या

तुळशीचे पाणी
करोनाच्या काळात तुळशीचे पाणी सर्वाधिक सर्च करण्यात आले होते. तुळशीचे पाणी प्यायल्याने खोकल्यापासून सुटका मिळण्यास मदत मिळते.

हळदीचे दूध
फुफ्फुसांमधील म्युकस आणि खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी हळदीचे दूध फायदेशीर ठरते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळदीचे दूध उत्तम स्त्रोत मानले जाते, कारण त्यामध्ये अँटीइन्फ्लामेंटरी गुणधर्म आढळतात.

रोगप्रतिकारक शक्ती
कोरोनाचा जगभरात पुन्हा उद्रेक झाल्यानंतर सर्वजण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे प्रयत्न करू लागले. त्यामुळे प्रतिकारक शक्ती वाढवण्याचे मार्ग आणि त्यासाठी मदत करणारे पदार्थ सर्वाधिक सर्च करण्यात आले.

घशाची खवखव
घशाची खवखव हे करोनाचे लक्षण असल्याचे डॉक्टरांकडुन सांगण्यात आले होते. त्यामुळे घशात खवखव जाणवल्यास त्यापासून त्वरित सुटका मिळवण्याचे घरगुती उपाय सर्वाधिक सर्च करण्यात आले.

आणखी वाचा: टाळ्या वाजवण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहेत का? लगेच जाणून घ्या

तापावरील उपाय
या काळात अनेकांनी तापावरील घरगुती उपाय सर्च केले होते.

शरीरातील ऑक्सिजन वाढवण्याचे उपाय
कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला, त्यामुळे अनेकांनी शरीरातील ऑक्सिजन वाढवण्याचे उपाय सर्च केले.