अनेकांना असं वाटतं की, शिळी चपाती ही आरोग्यासाठी चांगली नसते; मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट प्रमाणात केल्यास शरीराला त्याचा तोटा होत नाही. दरम्यान, शिळी चपाती खाण्याचे तुमच्या आरोग्याला काही फायदे होतात. हे फायदे नक्की काय आहेत हे तुम्ही या लेखातून जाणून घ्या. शिळ्या चपातीमुळे रक्तातील साखरही नियंत्रणात राहते. तुम्हाला मधुमेह असल्यास, तुम्ही सकाळी शिळी चपाती खाणे योग्य ठरते. रजिस्टंट स्टार्चसाठी हा एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे शर्करेचा त्रास असलेल्यांनी शिळी चपाती खाल्ल्यास त्यांना त्रास होणार नाही आणि साखर नियंत्रणात राहील

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रक्तातील साखर नियंत्रणात राहते

भारतीयांच्या आहारात प्रामुख्याने भात व चपात्यांचा समावेश असतो. या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार- हेच मधुमेह व स्थूलपणाचे मुख्य कारण असते. त्यांच्या मते- कर्बोदकांचे आहारातील प्रमाण कमी करावे आणि प्रथिने व तंतुमय पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढवावे. त्यामुळे रक्तातील साखर आणि शरीराचे वजन नियंत्रित करण्यासाठी मदत होते.

कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे तंतुमय पदार्थ आणि स्टार्च जास्त असलेले अन्न पचायला जास्त वेळ लागतो. त्यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, अँटी-ऑक्सिडंट्स व प्री-बायोटिक्स यांचाही समावेश होतो. यातून संथ गतीने ऊर्जा मिळत असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहून जास्त वेळ पोट भरलेले वाटते. शेंगा, बिया, काजू, फळे आणि भाज्यांमध्ये आढळणारा तंतुमय पदार्थ हा आतड्याच्या आरोग्यासाठी चांगला आहे. त्यामुळे अन्नाचे सेवन कमी होते आणि पचनास वेळ मिळतो. परिणामी जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.

कार्बोहायड्रेट्स शरीरारासाठी आवश्यक असतात. शरीराचा प्रकार व आरोग्याची परिस्थिती यानुसार कार्बोहायड्रेट्सचे आवश्यक प्रमाण अवलंबून असते. कार्बोहायड्रेट्स नसलेला आहार घेणे शक्य नसते. आपल्या आहारात कर्बोदके नसतील, तर आपल्या मेंदूला आवश्यक असलेल्या ग्लुकोजच्या पुरवठ्यावर परिणाम होईल. आहारातून कार्बोहायड्रेट्स पूर्ण वर्ज्य करण्याआधी इन्स्टंट फूड्स, नूडल्स, चिप्स, थंड पेये, समोसा, पिझ्झा, बर्गर असे पदार्थ पूर्णपणे टाळावेत. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करणारा दुसरा मोठा आहारबदल म्हणजे बटाटा. बटाट्याचे सेवन सुरू केले की, तुम्ही चपाती किंवा भाताचे प्रमाण कमी केले पाहिजे. तुमच्या आहारात कडधान्ये, शेंगा, दूध, दही, चिकन आणि माशांचा समावेश असला पाहिजे; तसेच ५० टक्के भाजीचेही सेवन गरजेचे आहे.

कर्बोदकांचे प्रमाण

कुठल्याही प्रकारचा आहार घेताना त्यात कर्बोदकांचे प्रमाण कमी असायला हवे. कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेटस् हे तीन पोषक पदार्थांपैकी एक आहेत. ते शरीरासाठी आवश्यक आहेतच; पण त्याचा आहारातील समावेश योग्य प्रकारे करायला हवा. प्रथम तुमच्या आहारात प्रथिने आणि तंतुमय पदार्थ असणे आवश्यक आहे. त्यात फळ, भाज्या, सॅलड यांचाही समावेश करू शकता. तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर उकडलेले अंडे, शिजवलेल्या भाज्या, बाजरी यांचे सेवन करा. जेवणात प्रथिनांचे प्रमाण जास्त असावे; जेणेकरून तुम्हाला दुपारच्या जेवणाआधी भूक लागणार नाही. म्हणजे बिस्किटे व कुकीज खाऊन आपले पोट भरत नाही. अशा वेळी शेंगदाणे, बदाम, अक्रोड व पिस्ता खाऊ शकता. दुपारच्या जेवणापूर्वी एक ग्लास पाण्यात नाचणी आणि विरघळणारे तंतुमय पदार्थयुक्त खाद्यपदार्थ घेतल्यानेही फायदा होतो.

दुपारच्या जेवणासाठी भाज्यांशिवाय भिजवलेली चणा डाळ, मूग डाळ (हरभरा) यांचा समावेश असलेल्या सॅलड्सपासून सुरुवात करा; ज्यामुळे प्रथिने-तंतुमय पदार्थांचे चांगले मिश्रण बनते. नंतर भाज्या, मांस, चिकन, मासे खाऊ शकता. त्यासोबत बाजरीची भाकरी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते.जेवल्यानंतर लगेच न झोपता १० ते १५ मिनिटे घरातच फेरफटका मारा. त्यामुळे साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

हेही वाचा – मुलांना डोळ्यांच्या समस्या आहेत? मग ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, वाचा डॉक्टर काय सांगतात

मधुमेहींसाठी वरदान

तेव्हा लक्षात घ्या की, शिळ्या चपात्या आणि भात हे जरी थंड पदार्थ असले तरी साखरेची वाढ होत नाही. जर तुम्हाला मधुमेह आहे, तर सकाळच्या वेळी शिळी चपाती दुधासोबत खाणे लाभदायक आहे. त्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेचा स्तर संतुलित राहील.चुकीचा आहार आणि अयोग्य जीवनशैलीमुळे आजकाल अनेक जण वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येशी झुंजत आहेत. जर तुम्ही खाण्याच्या या वेळेचे काटेकोरपणे पालन केले, तर नक्कीच तुम्ही तुमचे वाढते वजन सहज नियंत्रित करू शकता.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can a day old pasta and rotis control blood sugar better how to source cook and eat carbs the right way srk