How To Improved Energy Levels : तुम्ही टेन्शनमधे असाल, तर स्वतःच्या नाकाला चिमटा घ्या. मग तुम्ही लगेच शांत व्हाल किंवा चिंता कमी करण्यासाठी तुमचा हात तुमच्या हृदयावर ठेवा आणि हळुवार खोल श्वास घ्या. तर, असे करण्याच सल्ला आम्ही तुम्हाला देत नाही आहोत. या काही टिप्स आहेत; ज्या तुमच्या शरीराला शांत ठेवण्यास मदत करतात, (Improved Energy Levels) असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्यात पुढील काही गोष्टींचाही समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१. तुमच्या शरीराच्या ऊर्जेची पातळी वाढविण्यासाठी, डोळ्यावर थंड पाणी शिंपडा किंवा वेगाने चालत जा.

२. जेव्हा तुम्हाला नाकाद्वारे श्वास घेण्यास त्रास होत असेल, तेव्हा तोंडाच्या आतमध्ये बर्फाचा तुकडा ठेवा.

३. जर तुम्हाला झोप येत नसेल, तर एक मिनिटासाठी सतत डोळे मिचकवा.

म्हणून यापैकी काही उपाय किंवा हॅक आम्ही करून पाहिले. तेव्हा आम्हाला तात्पुरता आराम मिळाला. पण, या हॅकच्या मागे काही वैज्ञानिक कारण किंवा अभ्यास आहे का? हे जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजिस्ट, डॉक्टर सुधीर कुमार यांच्याशी चर्चा केली. डॉक्टरांच्या मते- हे नॉन स्पेसिफिक मेजर्स (non-specific measures) आहेत. म्हणजेच हे उपाय कोणत्याही खास परिस्थितीसाठी नाहीत, तर सर्वसामान्य किंवा विविध परिस्थितींमध्ये वापरता येऊ शकतात. उदाहरणार्थ, आरोग्यासाठी चांगले खाणे किंवा व्यायाम करणे हे विशिष्ट उपाय नाहीत; पण ते अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांसाठी उपयुक्त आहेत. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या गोष्टीची चिंता किंवा टेन्शन आहे (Improved Energy Levels) याची सखोल माहिती मिळवा आणि अस्वस्थता, चिंता व निद्रानाश यांमागील मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करा. मूळ कारण नक्की काय आहे हे समजल्यावर तुम्हाला त्यावर दीर्घकाळ टिकणारा उपाय मिळू शकेल, असे डॉक्टर सुधीरकुमार म्हणाले आहेत.

हेही वाचा…Masaba Gupta : मसाबा गुप्ताप्रमाणे कोमट पाण्यात बडीशेप, जिरे घालून पिणे फायदेशीर आहे का? वाचा गर्भवती महिलांसाठी आहारतज्ज्ञांनी दिलेला सल्ला…

नाकाला चिमटे काढणे किंवा पकडणे, हृदयावर हात ठेवून खोलवर श्वास घेणे किंवा सतत डोळे मिचकावणे आदी उपायांमुळे अस्वस्थता, चिंता व निद्रानाश या (Improved Energy Levels) लक्षणांमध्ये अल्पकालीन सुधारणा होऊ शकते. पण, तुमच्या शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी, चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडण्यापेक्षा किंवा वेगवान चालण्यापेक्षा निरोगी आहार, चांगली झोप व नियमित व्यायामावर लक्ष केंद्रित करणे जास्त महत्त्वाचे आहे, असे डॉक्टर कुमार म्हणाले आहेत.

डॉक्टर कुमार यांच्या मते, अन्न, तणाव, झोप या तिन्ही गोष्टींचा जवळचा संबंध आहे. तुम्हाला येणारा तणाव तुमच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतो; ज्यामुळे अन्न सेवनाच्या खराब सवयी लागणे, झोपण्याच्या पद्धतींमध्ये अडथळा हे त्रास उदभवू शकतात. त्यामुळे पुढे एक दुष्ट वर्तुळ निर्माण होते. म्हणजेच एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला नकारात्मकपणे प्रभावित करते आणि त्यामुळे समस्या आणखी वाढते.

… तर तुम्ही कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

नेहमी हायड्रेटेड रहा, श्वासोच्छ्वासाच्या व्यायामाचा सराव करा, ऊर्जा वाढवणे, मेंदूची कार्ये तीक्ष्ण करणे, तणाव कमी करणे व झोपेची गुणवत्ता सुधारणे (Improved Energy Levels) यांसाठी उपयुक्त आहेत, असा सल्ला डॉक्टर कुमार यांनी दिला आहे.

(टीप : कोणतीही दिनचर्या सुरू करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Energy sleep controlling anxiety focus on a healthy diet good sleep and regular exercises for improved energy levels read what doctor said asp