सध्याच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येकाला आपल्या आहाराकडे फारसे लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे दिनचर्या आणि आहारशैली बदलत राहते. अशा अनियमित जीवनशैलीमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उदभवू शकतात. चुकीच्या आहारामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उदभवतात. त्यातील सामान्य समस्या म्हणजे पोट फुगणे. यालाच ‘ब्लोटिंग’, असेही म्हणतात. ब्लोटिंगमध्ये पोटात जास्त गॅस जमा होतो आणि पोट फुगू लागते. असंतुलित आहार आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे लोकांना पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा जास्त खाल्ल्याने गॅस, पोट फुगणे, आंबट ढेकर येणे इत्यादी समस्या उदभवतात. गॅसच्या समस्येपासून आराम मिळविण्यासाठी दिल्ली येथील सी. के. बिर्ला हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग सल्लागार, डॉ. विकास जिंदाल यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डाॅक्टर सांगतात, “पोटात गॅस होण्याची समस्या खूप त्रासदायक असते. परंतु, ही खूप खूप सामान्य समस्या आहे. पोटात गॅस तयार होणे हा पचनाचा एक भाग आहे. पण, जेव्हा हा वायू तुमच्या आतड्यांत तयार होतो आणि बाहेर पडू शकत नाही, तेव्हा तुमचे पोट फुगायला लागते आणि वेदना होऊन अस्वस्थ वाटू लागते.” पोषण तज्ज्ञ न्मामी अग्रवाल यांनी जास्त गॅस आणि पोट फुगणे या समस्या दूर करण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करू नये, यासाठी इन्स्टाग्रामवर काही गोष्टी शेअर केल्या आहेत, त्या जाणून घेऊ.

‘हे’ पदार्थ खाल्ल्यास होईल पोटात गॅसनिर्मिती

१. दुग्धजन्य पदार्थ

दुध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये लॅक्टोज असते. ही साखर गॅस वाढायला कारणीभूत ठरते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे अनेक लोकांना लॅक्टोज पचायला जड जाते आणि दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने त्यांना गॅसचा त्रास होण्याची शक्यता असते. तुम्हाला गॅसची समस्या असल्यास चहा आणि काॅफी पिणे टाळा.

(हे ही वाचा : चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी बदाम खाणं उपयुक्त? एका दिवसात किती सेवन करावे, तज्ज्ञांकडून समजून घ्या योग्य पध्दत… )

२. फुलकोबी

फुलकोबीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्याने पचनसंस्थेवर दबाव येतो. त्यामुळे व्यक्तीला पोट फुगणे, गॅस आणि जुलाबाची समस्या होऊ शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला आधीच पचनाची समस्या असेल तर फुलकोबीचे सेवन मर्यादित प्रमाणात किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच करा. 

३. सफरचंद आणि नाशपाती

या फळांमध्ये फ्रॅक्टोज आणि फायबरचे प्रमाण जास्त असते; ज्यामुळे पोट फुगणे आणि गॅस होऊ शकतो. काही लोकांना रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यानेही गॅस होऊ शकतो.

४. कच्ची काकडी आणि कांदे

कच्च्या भाज्या, विशेषत: काकडी व कांदे यांसारख्या उच्च फायबर सामग्री असलेल्या भाज्या खाल्ल्याने गॅस होऊ शकतो. कांदे, लसूण आणि तत्सम पदार्थांमध्ये फ्रुक्टन आणि कर्बोदके असतात; ज्यातून गॅस निर्माण होऊ शकतो आणि पोट फुगू शकते.

पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी करा हे उपाय

पोटातील गॅसची समस्या टाळण्यासाठी आहारतज्ज्ञ सांगतात की, जास्त तळलेले वा तेलकट पदार्थ खाणे टाळा. मसालेदार किंवा कॅफिनयुक्त पदार्थ रात्री खाऊ नयेत. कारण- त्याचा झोपेवर परिणाम होतो. तसेच पोटात अ‍ॅसिड आणि गॅस निर्माण होऊन पचनसंस्थेच्या त्रासांना सामोरे जावे लागते. त्याशिवाय पुरेशा प्रमाणात हायड्रेटेड राहून, अन्न पूर्णपणे चघळणे आणि प्रो-बायोटिकसमृद्ध पदार्थांचा समावेश करून, संपूर्ण पाचनयुक्त आरोग्याला चालना देण्याचा प्रयत्न करा. सकस आहार घ्या आणि व्यायाम करा. समस्या उदभवल्यास आपल्या डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या, असेही ते नमूद करतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to get rid of gas pain fast here are ways you can reduce it pdb
First published on: 07-02-2024 at 12:11 IST