Cholesterol Control: जीवनशैलीत अनियमितता, धूम्रपान, मद्यपान, अतिवजन यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढीस लागते. कोलेस्ट्रॉल हा मनाप्रमाणे असतो तो ज्याचे रक्तातील प्रमाण वाढल्यास अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते. शरीराला पेशी पुनरुज्ज्वीत करण्यासाठी तसेच हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते मात्र जर याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढले तर अनेक जीवघेणे आजार शरीराला विळखा घालू शकतात. शरीरात अति कोलेस्ट्रॉल हे हृदय विकार, स्ट्रोक अशा समस्यांचे कारण ठरू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीडीसीच्या मते, उच्च कोलेस्टेरॉलची लक्षणे सामान्यत: गंभीर समस्या निर्माण होईपर्यंत दिसून येत नाहीत.हे जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्या एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी मोजणे. नियंत्रण न ठेवल्यास कोलेस्ट्रॉलचा थर शिरांमध्ये जमा होऊ लागतो. हे हृदयाला नुकसान पोहोचवते आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येऊ शकतो. न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांच्या माहितीनुसार कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे आहारावर लक्ष देणे. आज आपण चार असे पदार्थ पाहणार आहोत ज्यामुळे रक्तातून वाईट कोलेस्ट्रॉल बाहेर फेकण्यास आपण शरीराला अधिक सक्षम बनवू शकाल.

चिया सीड्स (अळशी)

चिया सीड्स मध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड, फायबर व अन्य पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. चीय सीड्स आहारात समाविष्ट केल्याने एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल रक्तातून मोकळे होऊन शरीरातून बाहेर टाकण्यास मदत होते. चिया सीड्सच्या सेवनाने रक्तदाब सुद्धा नियंत्रणात राहतो.

हे ही वाचा<< शरीरात HIV संक्रमण होताच दिसू लागतात ‘हे’ बदल; AIDS ची लक्षणे घरीच ओळखा

बार्ली (Barley)

बार्लीचे पीठ हे बीटा ग्लुकॉन व फायबर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते, ज्यामुळे हृदय विकारांचा धोका कमी होण्यास मदत होते. बीटा ग्लुकोन हे रोग प्रतिबंधक व अँटी हायपरकोलेस्टेरॉलिमीक असते. सोप्या शब्दात सांगायचं तर बार्लीचे पीठ हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यात तसेच पचन सुधारण्यात मदत करते. गव्हाच्या पिठाऐवजी बार्ली हा एक आरोग्यवर्धक उपाय ठरू शकतो.

अक्रोड (Walnuts)

अक्रोडमध्ये असणारे ओमेगा ३ फॅट्स हे मोनो सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडच्या रूपात हृदयाचे स्वास्थ्य सुधारण्यात मदत करतात. अक्रोडाचे सेवन खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास व चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवण्यास मदत होते.

हे ही वाचा<< तोंडाची दुर्गंधी ठरू शकते ‘या’ जीवघेण्या आजारांचे लक्षण; वेळीच करा ‘हे’ उपाय

सोयाबीन (Soybean)

शाकाहारी मंडळींसाठी सोयाबीन हा चिकनच्या तोडीस तोड पर्याय आहे. सोयाबीन हा अनसॅच्युरेटेड फॅट्स, फायबर, प्रोटीनचे स्रोत आहे. सोयाबीन मध्ये आइसोफ्लेवोन्स नामक घटक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित एका अहवालानुसार सोयाबीनमधील फ़ाइटोस्टेरॉलमुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलचे वाढ कमी होते.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to reduce cholesterol four best foods to control bad cholesterol know the foods list from expert svs
First published on: 02-12-2022 at 17:47 IST