लहान मुलं असलेले पालक असोत किंवा वारंवार शौचालयाला जावं लागतं अशा आरोग्य समस्या असलेले लोक – त्यांना आपल्या परिसरातील कोणती सार्वजनिक शौचालयं थोडीशी तरी वापरण्यासारखी आहेत की नाही, याची चांगलीच माहिती असते. पण नेहमीच चांगले शौचालय मिळते असे नाही. पण कधी कधी परिस्थितीमुळे अस्वच्छ दिसणारं शौचालय वापरावंच लागतं. तेव्हा मनात शंका येते, या सीटवर बसणं खरंच योग्य ठरेल का? ते स्वच्छ दिसत असले तरी धोकादायक आहे का?
सार्वजनिक शौचालयात काय असतं? (What’s in a public toilet?)
आरोग्यदायी प्रौढ व्यक्ती दररोज एक लिटरहून अधिक मूत्र आणि १०० ग्रॅमपेक्षा जास्त विष्ठा करतात. प्रत्येक जण मूत्र आणि विष्ठेतून जंतू व व्हायरस बाहेर टाकतो. विशेषत: जुलाब होत असलेले लोक अधिक प्रमाणात हानिकारक सूक्ष्म जीव बाहेर टाकतात.
म्हणूनच सार्वजनिक शौचालयं म्हणजे एक प्रकारे ‘जंतूंचे सूप’ असू शकतात, विशेषत: जेव्हा शौचालयांचा वापर जास्त लोकांकडून केला जात असतो आणि त्या तुलनेत त्यांची सफाई मात्र कमी प्रमाणात होत असते तेव्हा.
टॉयलेट सीटवर कोणते जंतू आढळतात? (What germs are found on toilet seats?)
टॉयलेट सीट आणि आजूबाजूच्या भागावर अनेक प्रकारचे जंतू आढळतात. त्यामध्ये आतड्यांतील ई- कोलाई, क्लेबसिएला, एंटरोकोकससारखे जीवाणू तसेच नोरोव्हायरस, रोटाव्हायरससारखे व्हायरस यांचा समावेश होतो. हे जंतू पोटाच्या संसर्गाला म्हणजेच गॅस्ट्रोएन्टरायटिसला कारणीभूत ठरू शकतात, ज्यामुळे उलट्या व जुलाब होतात. त्याशिवाय त्वचेवरील स्टॅफिलोकोकस ऑरियस (कधी कधी मल्टिड्रग-रेझिस्टंट प्रकारासह), तसेच स्यूडोमोनास, अॅसिनेटोबॅक्टर हे जीवाणू संसर्ग पसरवू शकतात. विष्ठेतून पॅरासाईट (worms) अंडी पसरतात आणि प्रोटोजोआ नावाचे सूक्ष्मजीव पोटदुखी निर्माण करतात. एवढेच नव्हे, तर टॉयलेटच्या रिमखाली आणि पृष्ठभागावर तयार होणाऱ्या जंतूंच्या मिश्र थराला ‘बायोफिल्म’ म्हणतात, जो सतत वाढत राहतो.
टॉयलेट सीट सर्वात अस्वच्छ भाग आहे का?(Are toilet seats the dirtiest part?)
नाही. एका अभ्यासानुसार, टॉयलेट सीटपेक्षा जास्त जंतू दाराचे हँडल्स, नळाचे हँडल्स आणि फ्लश लीव्हरवर आढळतात. कारण- हे भाग लोक सतत न धुतलेल्या हातांनी स्पर्श करतात.
विशेषतः उद्याने किंवा बसस्थानकातील सार्वजनिक शौचालयं दिवसातून एकदाच स्वच्छ केली जातात, त्यामुळे जंतू लवकर साठतात.
सूचक चिन्हं : लघवीचा वास, घाणेरडी जमीन, डोळ्यांना दिसणारी अस्वच्छता.
फ्लश केल्यानंतरचा धोका – “टॉयलेट प्लूम”(The biggest problem isn’t sitting, it’s flushing – Toilet plume)
फ्लश करताना जर झाकण नसेल, तर दोन मीटरपर्यंत जंतू व व्हायरस असलेले सूक्ष्म थेंब हवेत उडतात. याला ‘टॉयलेट प्लूम’ म्हणतात. हँड ड्रायरदेखील जंतू पसरवू शकतात. कारण- हात व्यवस्थि धुतलेले नसतात.
जंतू कसे पसरतात? (How can germs spread?)
१. त्वचेच्या संपर्काने – घाणेरड्या सीटवर बसल्याने किंवा हँडल्सला स्पर्श केल्याने
२. चेहऱ्याला हात लावल्याने – डोळे, तोंड किंवा अन्नाला स्पर्श केल्यावर
३. श्वसनाद्वारे – छोट्या व गर्दीच्या बाथरूममध्ये “टॉयलेट प्लूम” श्वासातून आत जाऊ शकतो
४. टॉयलेटमधील पाणी उडल्याने – फ्लशनंतरही टॉयलेट वॉटरमध्ये जंतू राहू शकतात.
स्वतःचं संरक्षण कसं करावं?(What can you do to stay safe?)
सीट कव्हर किंवा टॉयलेट पेपर वापरा
शक्य असेल तर सीट व झाकण अल्कोहोल वाईपने स्वच्छ करा आणि फ्लशपूर्वी झाकण लावा
किमान २० सेकंद साबणाने हात धुवा
साबण नसेल तर हँड सॅनिटायझर किंवा वाईप्स वापरा
हँड ड्रायर टाळा; पेपर टॉवेल वापरा
फोन टॉयलेटमध्ये वापरू नका आणि नियमित स्वच्छ करा
बेबी चेंजिंग एरिया वापरण्याआधी व नंतर स्वच्छ करा
सार्वजनिक टॉयलेट सीटवर बसणं सुरक्षित आहे का? (So is it safe to sit on public toilet seats?)
ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे अशा लोकांना फारसा धोका नसतो; पण मनःशांतीसाठी अल्कोहोल वाइपने स्वच्छ करणं किंवा सीट कव्हर वापरणं चांगलं. खरा धोका सीटपेक्षा हात, हँडल्स, टॉयलेट प्लूम आणि फोनमुळे वाढतो.
सर्वांत महत्त्वाचं –
हात नीट धुवा, पेपर टॉवेल वापरा, सीट स्वच्छ करा, फोन वापरू नका. कृपया टॉयलेटवर “तासभर” बसून राहू नका; यामुळे मुत्राशयावर ताण येतो.