Pee After Waking Up: जर सकाळी उठल्यावर लगेच लघवी करावीशी वाटत असेल आणि तुम्ही पटकन बाथरूमकडे धाव घेत असाल तर त्यात काही त्रास नाही. पण, जर लघवी टॉयलेटपर्यंत पोहोचण्यापूर्वीच लीक झाली, तर हे ओव्हरअॅक्टिव ब्लॅडरचे लक्षण आहे. पर्सनल फिटनेस एक्स्पर्ट आणि फंक्शनल न्यूट्रिशनवर लक्ष केंद्रित करणाऱ्या दीपिका शर्मा यांनी सांगितले की, सकाळी उठल्यावर लघवी करावीशी वाटणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे.
जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यायला तर शरीर लगेच काम सुरू करते. साधारण अर्ध्या तासात किडनी ते पाणी फिल्टर करायला लागते आणि ५-६ तासांत ब्लॅडर भरतं, म्हणूनच सकाळी झोपेतून उठल्यावर शरीर हे टॉक्सिन बाहेर टाकू इच्छितं आणि ब्लॅडर रिकामी करायचं असतं. रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायलात तर रात्री एकदा लघवीसाठी उठावं लागेल, हे अगदी सामान्य आहे.
सकाळी उठल्यावर लघवी लागते, यासाठी सवय जबाबदार आहे
तज्ज्ञांनी सांगितले की, सकाळी उठल्यावर लघवी लागणे हे दिवसभर पाणी पिण्याच्या सवयीवर अवलंबून असते. तज्ज्ञांच्या मते दिवसभर पाणी पिण्याची सवय खूप महत्त्वाची आहे. सकाळी एकदम दोन लिटर पाणी पिण्यापेक्षा किंवा झोपण्यापूर्वी पूर्ण ग्लास पाणी पिण्यापेक्षा दिवसभर थोडं-थोडं पाणी पिणं जास्त चांगलं आहे. दिवसभर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहील आणि रात्री झोपही बिघडणार नाही. तज्ज्ञांनी सांगितलं की, झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यानंतर एकदा लघवीसाठी उठणं सामान्य आहे, पण जर वारंवार उठावं लागत असेल, झोप तुटत असेल किंवा सतत तहान लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.
लघवी रोखल्याने आरोग्यावर कसा परिणाम होतो?
मीरा रोड येथील वॉक्हार्ट हॉस्पिटलमध्ये यूरोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. आशुतोष बघेल यांनी सांगितले की, लघवी रोखणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. आपलं ब्लॅडर हे एका फुग्यासारखं असतं ज्यात लघवी साठते. जसजशी लघवी भरत जाते, तसतसं तो मेंदूला सिग्नल पाठवतो की आता तो रिकामा करायचा आहे. जर आपण लघवी रोखली, तर ब्लॅडर फुगतो आणि त्याच्या भिंतींवर दबाव येतो. हे अगदी फुगा त्याच्या मर्यादेपेक्षा जास्त फुगवल्यासारखे आहे. ब्लॅडर फुटत नाही, पण त्यामुळे गंभीर समस्या होऊ शकतात.
जर लघवी बराच वेळ ब्लॅडरमध्ये राहिली तर ती बॅक्टेरियासाठी वाढ होण्याचं ठिकाण बनते आणि त्यामुळे UTI होऊ शकतो. UTI म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, ज्यामुळे लघवी करताना जळजळ, अस्वस्थता आणि गंभीर त्रास होऊ शकतो. वारंवार लघवी रोखल्याने ब्लॅडरचे कामकाजही बिघडू शकते. तज्ज्ञांच्या मते आपलं शरीर टॉक्सिन बाहेर टाकण्यासाठी आणि संतुलित पद्धतीने काम करतं. लघवी रोखल्याने ही प्रक्रिया थांबते आणि शरीरात असंतुलन निर्माण होऊ शकतं.
जास्त वेळ लघवी रोखल्याचे धोके
जर तुम्ही कामाच्या व्यापात वारंवार लघवी रोखून बसत असाल तर यामुळे अनेक समस्या होऊ शकतात. ब्लॅडर हा एक स्नायू आहे आणि त्याचे सिग्नल सतत दुर्लक्षित केले तर स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि ब्लॅडरची क्षमता कमी होऊ शकते, यामुळे इनकॉन्टिनन्स म्हणजेच लघवीवरचा ताबा सुटण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. डॉ. गुप्ता यांनी इशारा दिला की, वारंवार लघवी रोखल्याने ब्लॅडरमध्ये जास्त ताण येऊ शकतो, ज्यामुळे त्रास आणि नुकसान होऊ शकते. काही गंभीर प्रकरणांत “युरिनरी रिटेन्शन” अशी स्थिती येऊ शकते, ज्यात ब्लॅडर पूर्णपणे रिकामा होत नाही.