Sleeping Late at Night: तुम्हाला कधी वाटलंय का की, उशिरापर्यंत जागं राहणं सोपं वाटतं; पण लवकर उठणं खूप कठीण असतं? पण तुम्ही असं वाटणारे तुम्ही एकटे नाही आहात आणि तुम्ही आळशीही नाही. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय, नवी मुंबई येथील न्यूरोलॉजी तज्ज्ञ डॉ. यतीन सागवेकर यांच्या मते, याचं कारण आपल्या मेंदूच्या रचनेत आणि नैसर्गिक जैविक घड्याळात दडलं आहे.
“न्यूरोलॉजिस्टच्या दृष्टीनं पाहिलं तर, उशिरा झोप न लागणं आणि लवकर उठणं कठीण वाटण्याचं कारण आपल्या मेंदूतील जैविक घड्याळ- ज्याला सर्केडियन ऱ्हिदम म्हणतात,” असं डॉ. सागवेकर सांगतात. मेंदूच्या हायपोथॅलॅमस भागात असलेलं सूप्राकायाझमॅटिक न्युक्लियस (SCN) हे सर्केडियन ऱ्हिदमचं ठिकाण आहे. मेंदूतील जैविक घड्याळामुळे आपली झोप आणि जागं राहण्याच्या वेळा नियंत्रित होतात. हे घड्याळ वा ऱ्हिदम प्रकाश, हार्मोन्स व शरीराचं तापमान अशा संकेतांवर आधारित असतो.
तुम्ही सकाळी उठणारी व्यक्ती का नाहीत?
खूप लोकांमध्ये, विशेषतः किशोरवयीन आणि तरुणांमध्ये, हे अंतर्गत घड्याळ नैसर्गिकरीत्या उशिरानं चालतं. “याचा अर्थ असा की, त्यांना उशिरापर्यंत जागं राहण्याची नैसर्गिक इच्छा जास्त असते आणि झोपेसाठी शरीराला संकेत देणारा मेलाटोनिन हा हार्मोनही रात्री उशिरा स्रवतो,” असं डॉ. सागवेकर सांगतात. मेलाटोनिन उशिरा स्रवल्यामुळे लोकांना उशिरा झोपायला जाणं सोपं वाटतं; पण सकाळी लवकर उठणं खूप कठीण जातं.
“उशिरा झोपायला जाणं हे जैविकदृष्ट्या सोपं असतं; पण मेंदूला सकाळी लवकर जागं आणि सतर्क ठेवणं खूप कठीण असतं,” असं त्यांनी सांगितलं. “अॅडेनोसिन नावाचा न्यूरोट्रान्समीटर, जो दिवसभर मेंदूमध्ये साठतो आणि झोपेचा दबाव निर्माण करतो, तो आपण उशिरापर्यंत जागं राहिलो, तर कमी होतो,” असं डॉ. सागवेकर सांगतात. पण, जेव्हा आपण मेंदू तयार नसताना लवकर उठायचा प्रयत्न करतो, तेव्हा मेंदूमधील हा नाजूक समतोल बिघडतो.
“अॅडेनोसिन साफ होण्याचा आणि सर्केडियन जागरtकतेचा समतोल बिघडतो. ldयामुळे सकाळी लवकर अलार्म वाजल्यावर लोकांना सुस्ती आणि उठायला त्रास होतो,” असं त्यांनी समजावलं.
तंत्रज्ञान हे अजून वाईट करते…
आधुनिक जीवन या झोपेच्या घड्याळाला अजून वाईट करते. त्यांनी सांगितलं, “स्क्रीनवरचा प्रकाश मेलाटोनिन स्राव आणखी उशीर करतो, ज्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागं राहणं सोपं होतं.” तर, लवकर उठण्यासाठी शरीराला कॉर्टिसोल आणि शरीराचं तापमान लवकर वाढवावं लागतं; पण जर अंतर्गत घड्याळ अजून झोपेच्या स्थितीत असेल, तर ही प्रक्रिया हळू होते. “लवकर उठण्यासाठी कॉर्टिसोल आणि शरीराचं तापमान अचानक वाढावं लागतं; पण जर सर्केडियन ऱ्हिदम उशिरा असेल, तर शरीर अजून त्यासाठी तयार झालेलं नसतं,” असं डॉ. सागवेकर म्हणाले.
“न्यूरोलॉजिकली, रात्री उशिरा जागणारे लोक आणि सकाळी लवकर उठणारे लोक यांच्यात जैविक फरक असतो, ज्यामुळे रात्री उशिरा जागणारे लोक मध्यरात्रीनंतर चांगले काम करतात; पण त्यांना सकाळी लवकर उठायला त्रास होतो,” असं त्यांनी समजावलं. वेळ जात गेल्याने, नैसर्गिक ऱ्हिदम आणि जीवनशैलीच्या गरजा यांमधील ही तफावत निर्माण करू शकते खालील समस्या :
- दीर्घकालीन थकवा
- लक्ष न लागणं
- मनःस्थितीतील बदल
- झोपेच्या समस्या
सुदैवाने, मेंदूला समायोजित होण्यासाठी काही उपाय आहेत. “प्रकाशाचं प्रमाण बदलणं, नियमित झोपेचे वेळापत्रक ठेवणं आणि संध्याकाळी स्क्रीनवरचा वेळ कमी करणं यांमुळे मेंदूचं घड्याळ बदलू शकतं आणि सकाळी लवकर उठणं सोपं होऊ शकतं,” असं त्यांनी सांगितलं.