Side Effects Of Curd: जेवणाबरोबर दही खायला अनेकांना आवडते. काहीजण तर इच्छा होईल तेव्हा दही खातात. दह्यामध्ये कॅल्शियम, विटामिन बी २, विटामिन बी १२, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम भरपुर प्रमाणात आढळते. त्यामुळे दररोज दही खाणे फायदेशीर मानले जाते. पण फायद्यांसह दह्याचे काही साईड इफेक्ट्सही असतात, ज्यामुळे काही आजारांमध्ये दही टाळण्याचा सल्ला दिला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

PGDCC जर्मन युनिवर्सिटीच्या डॉक्टर तृप्ती अग्रवाल यांच्या मते काही आजरांमध्ये दही खाणे टाळावे. दह्याबरोबर नकळतपणे काही पदार्थ खाल्ल्याने पोटापासून त्वचेपर्यंत गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे काहो आजरांमध्ये दही खाणे टाळावे. दही खाणे कोणी टाळावे जाणून घ्या.

आणखी वाचा: चहा करून पावडर फेकून देताय? त्याचे फायदे जाणून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

संधिवात
संधिवाताचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी दही खाणे टाळावे. कारण दही खाल्ल्याने संधिवाताचा त्रास वाढू शकतो.

दमा
दम्याचा त्रास दह्यामुळे वाढू शकतो, त्यामुळे दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी दही खाणे टाळावा.

गॅस आणि अ‍ॅसिडीटी
गॅस आणि अ‍ॅसिडीटीचा त्रास दह्यामुळे वाढू शकतो, त्यामुळे हा त्रास असताना दही खाणे टाळावे.

आणखी वाचा: घराच्या खिडकीत कबुतरांनी मांडलाय उच्छाद? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून लगेच पळवून लावा

त्वचेची समस्या
ज्यांना त्वचेची समस्या असते त्यांनी दही अजिबात खाऊ नये. एक्जिमा, सतत खाज येणे, इन्फेक्शन, पिंपल्स असा त्रास असेल तर दही खाणे टाळावे.

लिकोरीया
ज्या महिलांना लिकोरीया आजार आहे, त्यांनी दही खाणे टाळावे. कारण दही खाल्ल्याने हा आजार बळावू शकतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the side effects of curd know who should avoid it pns