How To Get Rid Of Pigeons From Balcony: अनेकजण घरात किंवा बाल्कनीत सतत येणाऱ्या कबुतरांमुळे त्रस्त असतात. कबूतर सतत बाल्कनीमध्ये येऊन घाण करतात, असे बहुतांश ठिकाणी तुम्ही पाहिले असेल. शहरात तर याचे प्रमाण जास्त आहे. कबुतरांनी केलेल्या या घाणीमुळे तसेच त्यांच्या पंखांमुळे श्वसनाशी निगडित आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे कबुतरांपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला जातो. पण त्यासाठी नेमके कोणते उपाय मदत करतात हे माहित नसते. यासाठी कोणते सोपे घरगुती उपाय मदत करतात जाणून घ्या.

कबुतरांपासून सुटका मिळवण्यासाठी या सोप्या टिप्स करतील मदत

how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

आणखी वाचा: सिलेंडरवर असणाऱ्या अंकांचा अर्थ काय? त्याची Expiry Date असते का? जाणून घ्या

व्हिनेगर
कबुतरांना व्हिनेगरचा वास आवडत नाही, त्यामुळे कबुतरांना बाल्कनीत येण्यापासून थांबवण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी २-३ चमचे व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि थोडे पाणी मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण बाल्कनीत शिंपडा यामुळे कबूतर येणार नाहीत आणि बाल्कनीही अस्वच्छ होणार नाही.

वाईन आणि दालचिनी
कबुतरांना बाल्कनीत येण्यापासून रोखण्यासाठी वाईनचा देखील वापर केला जाऊ शकतो. यासाठी वाईनामध्ये थोडी दालचिनी पावडर मिसळून त्याची बाल्कनीमध्ये नियमित फवारणी करा. यामुळे बाल्कनीत कबूतर येणार नाहीत.

आणखी वाचा: थंडीत सतत अंगदुखी का होते? जाणून घ्या यामागचे कारण

चिकट पदार्थ
कबुतरांना बाल्कनीत येण्यापासून थांबवण्यासाठी चिकट पदार्थही मदत करतात. यासाठी मधासारखे चिकट पदार्थ बाल्कनीत ठेऊ शकता.

चमकदार गोष्टी
बाल्कनीत चमकदार गोष्टी ठेवा, चमकदार गोष्टी असतील तिथे कबूतर जाणे टाळतात. त्यामुळे कबुतरांना रोखण्यासाठी हे फायदेशीर ठरेल.

पिजन नेट
आजकाल बाजारात पिजन नेट मिळते, ज्याचा वापर करून पुर्ण बाल्कनीवर जाळीचे आवरण तयार करता येते. ज्यामुळे कबुतरांना रोखणे सोपे होते.