scorecardresearch

चहा करून पावडर फेकून देताय? त्याचे फायदे जाणून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Used Tea Leaves: चहा पावडरचे फायदे जाणून घ्या

चहा करून पावडर फेकून देताय? त्याचे फायदे जाणून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित
(Photo: Freepik)

Use Of Used Tea Leaves: चहा हे भारतीयांचे आवडते पेय आहे. सकाळी चहा प्यायला नाही तर काही जणांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये सर्वात आधी चहा बनवला जातो आणि मगच सर्व कामांना सुरूवात होते. चहा बनवण्यासाठी वापरणारी चहा पावडर आपण चहा बनवून झाल्यानंतर फेकून देतो. पण ही वापरलेली चहा पावडर अनेकप्रकारे फायदेशीर ठरते. जाणून घ्या वापरलेल्या चहा पावडरचे फायदे

वापरलेल्या चहा पावडरचे फायदे:

चहा बनवून झाल्यानंतर त्यात वापरलेली चहा पावडर फेकून न देता, त्यापासून अनेक फायदे मिळवता येतात. यासाठी एक मिश्रण बनवणे आवश्यक आहे, ते कसे बनवायचे जाणून घ्या.

  • वापरलेली चहा पावडर एका कपात घेऊन धुवून घ्या, यामुळे त्याच्यात उरलेली साखर, आलं किंवा इतर मसाले निघून जातील.
  • धुवून झाल्यानंतर त्यावर स्वच्छ पाणी टाका.
  • त्यांनतर ते थोडे उकळून गॅस बंद करा.

आणखी वाचा: घराच्या खिडकीत कबुतरांनी मांडलाय उच्छाद? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून लगेच पळवून लावा

फायदे

  • तयार केलेले मिश्रण थंड होऊ द्या, त्यानंतर स्प्रे बाटलीत भरा. या मिश्रणाचा वापर एखादी जागा स्वच्छ आणि निर्जंतुक करण्यासाठी करता येतो. जुन्या लाकडी फर्निचरची चमक टिकवुन ठेवण्यासाठी, आरसा किंवा पांढरी क्रॉकरी स्वच्छ करण्यासाठीही याचा वापर करता येतो.
  • शिजवलेली चहा पावडर कुंडीतील झाडांसाठी उत्तम खत ठरू शकते. चहाच्या पानांमध्ये असलेले टॅनिन मातीची आम्ल पातळी वाढवतात, ज्यामुळे झाडांची योग्य वाढ होण्यास मदत मिळते.
  • या मिश्रणाचा वापर नैसर्गिक कंडीशनर म्हणूनही करता येतो.
  • सुकलेली चहाची पानं एका वाटीत फ्रिजमध्ये ठेऊ शकता, यामुळे फ्रिजमधील भाज्यांचा किंवा इतर पदार्थांचा वास शोषून घेतला जाईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 14:30 IST

संबंधित बातम्या